18 तास फुटबॉल पकडून पोहत राहिला इसम
जगात एकाहून एक अचंबित करणारया घटना घडत असतात. ग्रीसमध्ये घडलेली एक घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. तेथील समुद्रात अडकलेला एक व्यक्ती फुटबॉलच्या मदतीने 18 तासांपर्यंत पोहत राहिला. वाचताना अजब वाटत असले तरीही ही घटना सत्य आहे. हा पर्यटक ग्रीसच्या कसांद्रा येथील मयती समुद्रकिनाऱयावर मोठय़ा लाटांदरम्यान अडकून पडला होता.
या व्यक्तीचे नाव इवान (इवान) असून तो उत्तर मेसेडोनियाचा रहिवासी आहे. त्याचा शोध न लागल्याने मित्रांनी तटरक्षक दलाकडे तो बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. नंतर त्याला ‘लॉस्ट ऍट सी’ घोषित करण्यात आले. तटरक्षक दल त्याचा वेळेत शोध घेऊ शकले नसले तरीही एका मुलाच्या बॉलने चमत्कारिक स्वरुपात त्याला वाचविले आहे.
इवान जेव्हा लाटांदरम्यान अडकून पडला होता, तेव्हा त्याच्याकडे एक चेंडू तरंगत आला, इवानने स्वतःला वाचविण्यासाठी या चेंडूला पकडले. तटरक्षक दलाने शोध लावेपर्यंत इवानने हा चेंडू पकडून ठेवला होता. यादरम्यान त्याने बॉलच्या मदतीने 18 तास समुद्रात काढले होते. इवानला समुद्रातून बाहेर काढण्यात आले, परंतु त्यांचा एक मित्र मार्निट जोवानोस्की अद्याप बेपत्ता आहे.
इवानच्या या अद्भूत कहाणीला ग्रीक प्रसारमाध्यमांनी मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी दिली आहे. इवान, त्याचे वडिल आणि कंसाद्राच्या महापौर नास्तासिया चाल्का यांनी बॉलसोबत छायाचित्रे काढून घेतली आहेत. ही छायाचित्र पाहिल्यावर एका महिलेने या बॉलला ओळखले. टीव्हीवर हा बॉल पाहिल्यावर तो माझ्या मुलांच्या बॉलसारखाच वाटला. हा बॉल माझ्या मुलांचा असून तो इवानला वाचविण्याच्या 10 दिवसांपूर्वी हरवला होता. हा बॉल लेमनोस बेटावर हरवला होता, हे ठिकाण इवानचा शोध लागलेल्या जागेपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे.