Tarun Bharat

बाजारात घसरणीचे सत्र कायम

Advertisements

सेन्सेक्स 188 अंकांनी प्रभावीत : बाजार सलग सातव्या दिवशीही प्रभावीत

वृत्तसंस्था /मुंबई

भारतीय भांडवली बाजारात सलगच्या सातव्या दिवशी घसरणीचे सत्र राहिले आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 188 अंकांनी नुकसानीत राहिल्याचे दिसून आले. यासोबतच जागतिक पातळीवर मिळताजुळता कल राहिला होता. दरम्यान आर्थिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांनी केलेल्या विक्रीमुळे बाजार नकारात्मक कल प्राप्त करुन बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 188.32 अंकांनी प्रभावीत होत 0.33 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 56,409.96 वर बंद झाला आहे. यामध्ये काहीवेळ निर्देशांक 57,166.14 च्या उच्चांकावर तर 56,314.05 अंकांच्या नीचांकी पातळीवर राहिल्याचे दिसून आले. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 40.50 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 16,818.10 वर बंद झाला आहे.  रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचा रेपो दर वाढीविषयी निर्णय व्हायचा असून त्यावर बाजाराचे लक्ष आहे. रेपो दरात 50 बेसीस पॉइंटची वाढ होणार असल्याचे तज्ञांनी मत नोंदवले आहे. ते कितपत खरे होते, ते पाहावे लागेल. जागतिक बाजारांची नाजूक स्थिती व रुपयाची नीचांकी पातळीकडे वाटचाल याचाही परिणाम बाजारावर जाणवत होता. त्यामुळे गुंतवणूकदारही सावधगिरीची पावले टाकताना दिसत आहेत. 

प्रमुख कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, टेक महिंद्रा, टायटन, कोटक महिंद्रा बँक, टीसीएस, बजाज फायनान्स, विप्रो आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. अन्य कंपन्यांमध्ये आयटीसी, डॉ.रेड्डीज लॅब, टाटा स्टील, सनफार्मा आणि नेस्ले यांचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.

जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये आशियातील दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्की हे लाभात तर चीनचा शांघाय कम्पोझिट तसेच हाँगकाँगचा हँगसेंग हे घसरणीत होते. युरोपीय मुख्य बाजारातील कामगिरी मात्र प्रभावीत झाली आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.45 टक्क्यांच्या घसरणीसोबत 88.92 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे. शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून 2,772.49 कोटी रुपयांच्या किमतीच्या समभागांची विक्री झाली आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • आयटीसी……….. 333
 • डॉ.रेड्डीज लॅब…. 4359
 • टाटा स्टील…… 96.85
 • सनफार्मा……….. 930
 • नेस्ले………….. 19080
 • महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1256
 • एनटीपीसी……… 159
 • भारती एअरटेल… 765
 • अल्ट्राटेक सिमेंट. 6200
 • पॉवरग्रिड कॉर्प…. 208
 • ऍक्सिस बँक…….. 718
 • इन्फोसिस…….. 1397
 • इंडसइंड बँक….. 1143
 • हिंदुस्थान युनि.. 2701
 • ओएनजीसी…….. 126
 • मॅक्स फायनान्स.. 774
 • बंधन बँक……….. 260
 • सिप्ला…………. 1119
 • अरोबिंदो फार्मा… 509
 • सीजी कझ्युमर….. 413
 • कोलगेट……….. 1609

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • एशियन पेन्ट्स.. 3384
 • टेक महिंद्रा……. 1010
 • टायटन………… 2531
 • कोटक महिंद्रा…. 1765
 • बजाज फायनान्स 7104
 • टीसीएस………. 2997
 • विप्रो…………….. 393
 • बजाज फिनसर्व्ह 1635
 • लार्सन ऍण्ड टुब्रो 1820
 • स्टेट बँक…………. 521
 • मारुती सुझुकी… 8661
 • आयसीआयसीआय 844
 • एचडीएफसी बँक 1383
 • रिलायन्स इंडस्ट्रीज 2325
 • एचडीएफसी….. 2238
 • एचसीएल टेक….. 922
 • ल्यूपिन………….. 654
 • हिरोमोटो……… 2534
 • बजाज ऑटो…… 3491
 • अदानी पोर्ट…….. 816
 • मॅरिको   540

Related Stories

‘अदानी-टोटल’ आता चार्जिंग क्षेत्रात उतरणार

Patil_p

सार्वजनिक खर्च वाढवा

Patil_p

चालू वर्षात स्मार्टफोन विक्रीत घसरणीचे संकेत

Patil_p

कू ऍपचे दीड कोटी ग्राहक

Patil_p

विक्रीचा प्रभाव : सेन्सेक्स 839 अंकांनी कोसळला

Patil_p

कायम स्वरुपी घरातून काम आरोग्यास धोकादायक?

Patil_p
error: Content is protected !!