Tarun Bharat

राजहंसगडाचे सुशोभिकरण प्रगतिपथावर

Advertisements

किल्ल्याची डागडुजी, सुशोभिकरण : मूर्तीकरिता 4 कोटीचा निधी

वार्ताहर /धामणे

राजहंसगडाच्या सुशोभिकरण कामाची सुरुवात नुकतीच ग्रामीणचे युथ काँग्रेस अध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली.

ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 2018 मध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती राजहंसगडावर बसवून गडाचे सुशोभिकरण करण्याचे जाहीर केले होते. या कामासाठी संस्कृती विभाग बेंगळूर यांच्याकडून किल्ल्याची डागडूजी, सुशोभिकरण व मूर्तीसाठी 4 कोटींचा निधी उपलब्ध करून घेतला.

त्यापैकी 50 लाख रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसाठी मूर्तिकार विक्रम पाटील यांना देण्यात आले. राजहंसगडावर मूर्ती बसविण्यासाठी चौथऱयाचे काम पूर्णत्वाकडे असून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रयत्नातून हे ऐतिहासिक सुशोभिकरण व छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती बसविण्याचे काम हाती घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.

राजहंसगडावरील चौथऱयाचे काम प्रसिद्ध इंजिनिअर एम. एम. मुतगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून राजहंसगडाची डागडूजी आणि सुशोभिकरण कामाला नुकतीच युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते पूजन करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी सिद्धाप्पा छत्रे, सचिन थोरवत, नागेंद्र थोरवत, बाबाजी जाधव, नारायण नावगेकर, व्यंकट पाटील व इतर उपस्थित होते.  

Related Stories

बेळगुंदीतील रवळनाथ यात्रा भक्तिमय वातावरणात

Omkar B

श्रेष्ठा फौंडेशनतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

Amit Kulkarni

अनैतिक संबंधातून युवकाचा निर्घृण खून

Rohan_P

तात्पुरते बसस्थानक हटविणार

Amit Kulkarni

खानापुरात ख्रिसमस अत्यंत साधेपणाने साजरा

Omkar B

गटारीत पडून युवकाचा मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!