झोपेत कूस बदलताच विदेशात पोहोचतात लोक
जर कुणी तुम्हाला दोन देशांची सीमा त्याच्या घरातून जात असल्यास सांगत असल्यास प्रथम तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. युरोपचे बार्ले शहर एक असे अनोखे ठिकाण आहे, जेथे एक देशात नाश्ता तयार करता येतो तर दुसऱया देशात जाऊन तुम्ही खाऊ शकता. एवढेच नाही तर एक पाऊल टाकून तुम्ही दुसऱया देशात पोहोचता.
बार्ले शहर नेदरलँड आणि बेल्जियम या दोन देशांच सीमेदरम्यान वसलेले आहे. या दोन देशांच्या सीमा बार्ले शहरातील अनेक घरांमधून जाते. याचमुळे येथील लोकांचे एक पाऊल नेदरलँडमध्ये असू शकते तर दुसरे पाऊल बेल्जियममध्ये
एका क्षणात दुसऱया देशात
बार्लेचे रहिवासी एका क्षणात एका देशातून दुसरया देशात पोहोचू शकतात. कारण दोन देशांच्या सीमा त्यांच्या घरामधून जाते. येथील अनेक सामुदायिक भवन, रेस्टॉरंट, कॅफे हाउस इत्यादींचा निम्मा हिस्सा नेदरलँडमध्ये तर निम्मा हिस्सा बेल्जियममध्ये आहे.
बार्ले शहराचा काही भाग नेदरलँड्सकडे आहे. तर काही भाग बेल्जियमकडे आहे. नेदरलँडकडील भागाला बार्ले-नॅस्स्यू या नावाने ओळखले जाते. तर बेल्जियमकडील भागाला बार्ले-हरटोग म्हटले जाते. सीमा रेषा एक पांढरा क्रॉस तयार करत आखण्यात आली आहे. अनेक घरे, दुकाने, रेस्टॉरंटमधून ही सीमारेषा जाते. अनेक घरांमध्ये बेड पांढऱया क्रॉसच्या वर आहे, म्हणजेच कूस बदलताच बार्लेचे रहिवासी दुसऱया देशात पोहोचतात.
या बार्ले शहरात प्रत्येक गोष्टी दोन आहेत. शहराला दोन नावे, नगरपालिका आणि पोस्ट ऑफिस देखील दोन आहेत. परंतु या सर्वांचे नियंत्रण एकच समिती करते. स्वतःचा हाच अनोखेपणा आणि रंजक सीमुळे हे शहर चर्चेत असते. जगभरातून पर्यटक हे शहर पाहण्यासाठी येतात आणि अनोख्या सीमेवर उभे राहत छायाचित्रे काढून घेतात.