Tarun Bharat

भाजपने एसटी समाजाला खऱया अर्थाने प्राधान्य दिले

द्रौपदी मुर्म यांच्या निवडीबध्दल केंद्रीय नेत्याचे आभार. जि. पं. सदस्य गोपाळ सुर्लकर.

डिचोली/प्रतिनिधी

या भारत देशत अंत्योदय तत्वावर केवळ भाज पक्षच कार्य करीत असून तळागळातील लहान समाजाच्या लोकांना आज भाजप प्रमुख प्रवाहात आणत आहे. देशात होणाऱया राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने द्रौपदी मुर्म? यांचे नाव पुढे केल्याने या देशातील एसटी समाजाला खऱया अर्थाने मानाचे स्थान मिळाले आहे. असे जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

   समाजसेवेत सदैव अग्रेसर राहून आपले नाव राष्ट्रीय पातळीवर चमकविलेल्या द्रौपदी मुर्म? यांनी आमदार, मंत्री, राज्यपाल या पदांची धुरा सांभाळत आपल्यातील प्रशासनातील कुशलता दाखवून दिली आहे. त्यांचा साधेपणा आणि समाजाप्रती असलेली आत्मयिता यामुळे त्यांना आज देशातील सर्वोच्च पद मिळले आहे. उच्च पदावर जाऊनही पाय जमिनीवर ठेवणाऱया द्रौपदी मुर्म? यांच्या निवडीमुळे गोव्यातील एसटी समाजाच्या लोकांना आनंद झाला आहे. तसेच त्यांचे उमेदवारीवर नाव गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुचविल्याने ती गोव्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. असेही गोपाळ सुर्लकर यांनी पुढे म्हटले.

    या पत्रकार परिषदेला गोवा राज्य एसटी मोर्चा सचिव शिवाजी जल्मी, उत्तर गोवा एसटी मोर्चा सचिव प्रदीप गावडे, साखळी एसटी मोर्चाचे अध्यक्ष शिवा मुळगावकर, डिचोलीचे अध्यक्ष दयेश गावडे, मयेचे अध्यक्ष जयंत कवळेकर, सचिव ललना गिमोणकर आदींची उपस्थिती होती.

  केंद्र सरकारचा सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा मंत्र खरा करून दाखविताना भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आदिवासी समाजालाही प्राधान्य दिले आहे. ज्यामुळे या समाजाचीही मान अभिमानाने उंच होणार आहे. आज केंद्र सरकार तसेण राज्य सरकारही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अंत्योदय तत्वावर काम करीत आहे. याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, असे प्रदीप गावडे यांनी म्हटले.

यावेळी शिवा मुळगावकर यांनी द्रौपदी मुर्म यांना देशातील सर्व आमदार खासदार यांनी मतदान करून निवडून आणावे, असे आवाहन केले.

Related Stories

दाबोळी विमानतळासमोरील उड्डाण पुलाचे काम पूर्ण, मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडून पाहणी

Omkar B

कंत्राटी कामगारांची सरकारी सेवेत पूर्ण वेळ घेण्याची मंत्री मायकल लोबोकडे मागणी

Patil_p

“जागतिकीकरण झालेल्या जगात मानवी संबंधांच्या उणीवेला बॉर्डर हे माझे उत्तर”: दिग्दर्शक डेव्हिडे डेव्हिड

Archana Banage

सहा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Amit Kulkarni

ताळगावात शेतकऱयांना मोफत भातकापणी यंत्र

Amit Kulkarni

रेनकोट, छत्र्या मार्केटमध्ये दाखल

Patil_p