Tarun Bharat

विमानतळावर तुमचा चेहरा असेल बोर्डिंग पास

Advertisements

हवाई प्रवाशांसाठी ‘डिजित्रा’ ऍप सुरू ः चेहऱयाची ओळख पटवणारी प्रणाली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील दिल्ली आणि बंगळूरु विमानतळांनी देशांतर्गत प्रवाशांच्या चेहऱयाच्या ओळखी(एफआर) साठी डिजिटल ऍप लाँच केले आहे. हे ऍप सुरू करण्यात आल्यामुळे प्रवाशांची आता विमानतळावरील प्रवेशाच्या त्रासातून सुटका होणार आहे. सध्या ऍपचे बीटा व्हर्जन लाँच करण्यात आले असून लवकरच ते पूर्ण स्केलवर सादर केले जाऊ शकते.

दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, या ऍपच्या मदतीने सर्व चेकपॉईंट्सवर प्रवेश हा चेहऱयाच्या ओळखीवर आधारित असेल. एअरपोर्टवर प्रवेश, सिक्युरिटी चेक आणि बोर्डिंग गेट अशा तिन्ही ठिकाणी ऍपद्वारे हे काम केले जाईल. दिल्ली विमानतळावर हे नुकतेच देशांतर्गत प्रवाशांसाठी टी 1 टर्मिनलवर सुरू करण्यात आले आहे.

आता अँड्रॉईड यूजर्सना ही सुविधा मिळणार

बंगळूरु इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने एका निवेदनात म्हटले आहे की, या ऍपच्या बीटा आवृत्तीची विस्तारा आणि एअर एशिया फ्लाइटमध्ये चाचणी घेण्यात आली आहे. डिजिटल ऍपची बीटा आवृत्ती अँड्रॉईड ओएस प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. ऍपलच्या आयओएस प्लॅटफॉर्मवर पुढील काही आठवडय़ात ऍप उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. सध्या डिजिटल ऍप वापरणे बंधनकारक करण्यात आले नसून, ज्या प्रवाशांना ते वापरायचे आहे ते ते डाउनलोड करू शकतात.

ऍपचा वापर सध्या ऐच्छिक  

नोंदणीसाठी प्रवाशांना आधार तपशील द्यावा लागेल. याशिवाय त्यांना कोविड-19 लसीकरणाच्या तपशीलांसह सेल्फी अपलोड करावा लागेल.

फेशियल रेकग्नि शन सिस्टम म्हणजे काय?

सदरची सुविधा ही एक बायोमेट्रिक प्रणाली आहे जी व्यक्तीचा चेहरा, डोळे, तोंड यांच्या संयोगाने ओळखते. नंतर चेहऱयाची 3 डि प्रतिमा तयार केली जाते आणि ओळखण्यासाठी डेटाबेसमध्ये जतन केली जाते. या तंत्रज्ञानाचा शोध अमेरिकन शास्त्रज्ञांच्या चमूने लावला आहे. त्यात वुडी ब्लेडसो, हेलन चॅन वुल्फ आणि चार्ल्स बायसन आदिंचा समावेश होता.

एफआर प्रणाली कशी कार्य करते?

ज्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही विमान कंपनीकडून तुमचे तिकीट बुक करता, त्याचवेळी विमानतळावर पोस्ट केलेल्या संबंधित एजन्सी तुमच्या प्रवासाशी संबंधित माहिती पोहोचवते. जेव्हा तुम्ही विमानतळाच्या टर्मिनल गेटवर पोहोचता तेव्हा तेथे बसवलेला चेहरा ओळखणारा कॅमेरा तुमचा चेहरा ओळखेल. एकदा तुमच्या ओळखीची पुष्टी झाल्यावर, कॅमेऱयाला जोडलेली क्रीन तुमचा फोटो, आयडी आणि प्रवासाची सर्व माहिती प्रदर्शित करेल.

Related Stories

क्रॉम्प्टन किचन अप्लायन्सेस क्षेत्रात उतरणार

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि.1 जानेवारी 2022

Patil_p

आयकीयाचे शॉपिंग ऍप लाँच

Amit Kulkarni

इंडियन मोटरसायकलकडून नवी ‘चीफ’ दुचाकी सादर

Patil_p

एलआयसीचे नव्या प्रीमियममधून उत्पन्न वाढले

Patil_p

कल्पतरुचा समभाग वधारला

Amit Kulkarni
error: Content is protected !!