Tarun Bharat

वेळणेश्वरच्या समुद्रात नौका बुडाली

पोलीस कादवडकरांच्या प्रसंगावधानाने तिघे मच्छीमार वाचले ः  1 लाखाचे नुकसान

प्रतिनिधी/ गुहागर

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तावर असलेले पोलीस कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे समुद्रात बुडालेल्या नौकेतील तिघा मच्छीमारांना वाचवण्यात यश आले. शुक्रवारी दुपारी 3.45 वाजता वेळणेश्वरच्या समुद्रात मेरुमंडल (स्मशानाजवळील परिसर) येथील खडकाळ भागात एका लाटेच्या तडाख्याने कोंडकारुळची मच्छीमार नौका (पगार) बुडाली. यामध्ये मच्छीमारांचे सुमारे 1 लाखाचे नुकसान झाले आहे.

  गुहागर तालुक्यातील कोंडकारुळचे तीन मच्छीमार यशवंत गंगाजी झर्वे (58, रा. जांभुळवाडी), संजय लक्ष्मण जागकर (40, रा. लक्ष्मीनगर) आणि विलास लक्ष्मण जागकर (62, रा. नामदेववाडी) हे शुक्रवारी दुपारी 1 वा. छोटी मच्छीमार नौका (पगार) घेवून वेळणेश्वरच्या दिशेने मच्छीमारीसाठी निघाले होते. दुपारी 3.45 च्या दरम्यान त्यांची नौका वेळणेश्वर येथील मेरुमंडल या खडकाळ भागात आली. यावेळी नेहमीपेक्षा उंच लाटा येत होत्या. अशाच एका लाटेने नौका अचानक उलटली. यात तिघेही मच्छीमार समुद्रात पडले. त्यांनी आरडाओरडा सुरु केला.  दरम्यान अनंत चतुदर्शीच्या दिवशी समुद्रकिनाऱयावर गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी गुहागर पोलीस  

ठाण्यातील पोलीस कादवडकर हे त्यांच्या काही सहकाऱयांसह उपस्थित होते. समुद्रात मच्छीमारांनी केलेला आरडाओरडा कादवडकरांच्या लक्षात आला. तातडीने त्यांनी वेळणेश्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर यांना ही बाब सांगितली. लगेचच धोपावकर यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली आणि या तिघाही मच्छीमारांना सुखरुप समुद्रकिनाऱयावर आणले. कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे आणि वेळणेश्वरचे सरपंच व ग्रामस्थांनी केलेल्या मदतकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

  मच्छीमारांना समुद्रकिनाऱयावर आणल्यानंतर समुद्रात बुडालेली नौका बाहेर काढण्याचे प्रयत्न स्थानिक मच्छीमारांनी सुरु केले आहेत. मात्र लाटांमुळे बुडालेली नौका बाहेर काढणे सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शक्य झाले नव्हते. छोटी नौका बुडाल्याने या मच्छीमारांचे सुमारे 1 लाखाचे नुकसान झाले आहे.

Related Stories

उभादांडा येथील ‘वुडहाऊस’ला उधाणाचा तडाखा

NIKHIL_N

मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Anuja Kudatarkar

कोकणातील मगरींच्या गावात निसर्ग पर्यटन बोट सफारी!

Patil_p

शिरगाव डुबी नदीत गाळ उपसण्याच्या नावाखाली वाळू उपसा

Archana Banage

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचाऱयांचे प्रशिक्षण सुरळीत

Patil_p

सह्याद्री माध्यमिक विद्यालय, भडगांव बु. स्कूलचा निकाल 100 टक्के

Anuja Kudatarkar