ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Nitin Gadkari पुण्याच्या चांदणी चौकातील पुलामुळे वाहतूकीची मोठी समस्या भेडसावत आहे. येत्या 2-3 दिवसात हा पूल पाडला जाईल. तसेच नव्या पुलाचे कामही लवकरात लवकर सुरू केले जाईल, अशी माहिती केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गडकरी म्हणाले, मी पुणे विभागातील रस्ते योजनांचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. विशेषत: चांदणी चौकातील पूल. हा पूल येत्या 2-3 दिवसात उड्डाणपूल पाडला जाईल. तसेच नव्या पुलाचे कामही लवकरात लवकर सुरू केले जाईल. जूनमध्ये त्या पुलाचे उद्घाटन व्हावे, असा प्रयत्न असेल.
अधिक वाचा : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल
वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे आणि परिसरात नवीन रस्त्यांचे बांधकाम केलं जाईल. पुणे-शिरुर नगर-औरंगाबाद रस्त्यात तीन मजली उड्डाणपुल होणार आहे. टाउन प्लॅनींगनुसार या सगळय़ा मार्गाची रचना होणार आहे. पुण्यात डबलडेकर इलेक्ट्रीक बस सुरू करण्याचाही विचार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला जागा दिली तर त्या ठिकाणी लॉजिस्टीक पार्क बांधण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च करणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.