The bridge connecting Maharashtra – Goa has collapsed
महाराष्ट्र व गोवा राज्य जोडणाऱ्या सातार्डा येथील तेरेखोल पुलाची डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुलाला हादरे बसत आहेत . पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांचे लक्ष वेधले असता तेरेखोल पुलाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पुलाच्या दोन्ही बाजुनीं सावंतवाडी व पेडणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पुलाच्या मजबुतीकरणासाठी डांबरीकरण करण्यात आले होते. सावंतवाडी बांधकाम विभागाकडून लोखंडी प्लेट घालून पुलाची दुरुस्ती करण्यात आली होती.
तेरेखोल पुलाची दुरुस्ती केल्यानंतर सहा वर्षांनी पुन्हा पुलाच्या सातार्डा गावाच्या हद्दीलगताचे डांबरीकरण व लोखंडी प्लेट निखळल्याने पुलाला जोरदार हादरे बसत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
सातार्डा / वार्ताहर