Tarun Bharat

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बिगुल वाजला

फिरोज मुलाणी  /औंध

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरुन उडालेला वादाचा धुरळा गुरुवारी बसला आहे. 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर अखेर अहमदनगरला वाडीया पार्क येथे 65 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. आ. संग्राम जगताप स्पर्धेच्या यजमानपदाची धुरा सांभाळतील.

महाराष्ट्र केसरी राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च किताब असलेली मानाची स्पर्धा आहे. स्पर्धेकडे राज्यातील तमाम कुस्तीशौकीनांचे डोळे लागलेले असतात. गेल्या महिन्यात स्पर्धा आयोजनावरुन कुस्ती क्षेत्रातील दोन गटातच कुस्ती सुरू झाली होती. याकरिता दोन्ही गटांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. डाव प्रतिडाव सुरू असल्याने महाराष्ट्र केसरी आयोजनाचे मैदान कोण मारणार याबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पुणे येथे झालेल्या कार्यकारणी बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

Related Stories

मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयच्या रडारवर अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण!

Patil_p

आरआरचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिशांत यांना कोरोना

Patil_p

नदाल, फेडरर, जोकोविच यांची आगेकूच

Patil_p

इस्ट बंगाल प्रशिक्षकपदाची धुरा रिव्हेराकडे कायम

Patil_p

ओसाका, जोकोविच दुसऱया फेरीत

Patil_p

वीज,धातू क्षेत्रातील विक्रीमुळे बाजार घसरणीसह बंद

Patil_p