महागाई आणखी वाढणार ः सुधारित जीएसटी दरानुसार खाणे-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गॅस आणि इंधन दरवाढीचा फटका सहन करणाऱया सर्वसामान्यांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे. सोमवार, 18 जुलैपासून नवीन जीएसटी दर लागू होणार असल्याने महागाईचा बोजा आणखी वाढणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत जीएसटी कौन्सिलने काही वस्तूंच्या जीएसटी दरात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमुळे दही, लस्सी, तांदूळ, मैदा यासह अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दरात बदल होणार आहेत.
केंद्र सरकारने अनेक वस्तूंसाठी नवे जीएसटी दर लागू केले आहेत. सुधारित जीएसटी दरानुसार खाणे-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. अन्नधान्यांवरही जीएसटी लागू होणार आहे. धान्य आणि डाळीच्या किंमतीही 8 ते 10 टक्क्मयांनी वाढणार असल्याचे संकेत व्यापारी वर्गातून मिळत असून हा महागाईचा भार थेट ग्राहकांवरच पडणार आहे. साहजिकच नजिकच्या काळात महागाई आणखी रडवणार आहे.
दुग्धजन्य पदार्थ जीएसटीच्या कक्षेत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पहिल्यांदाच जीएसटीच्या कक्षेत दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत टेट्रापॅक केलेले दही, लस्सी आणि बटर मिल्कवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. इतकेच नाही तर ब्रँड नसलेले प्री-पॅकेज केलेले आणि प्री-लेबल केलेले पीठ आणि डाळींवरही 5 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. इतकेच नाही तर बँकेकडून जारी करण्यात येणाऱया धनादेश सेवांवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
कृषीपूरक साहित्याचीही दरवाढ
एलईडी लाईट्स आणि लॅम्पच्या किंमतीदेखील वाढण्याची शक्मयता आहे. सरकारने या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्मयांहून 18 टक्क्मयांवर केली आहे. सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे. तसेच बियाणे साफ करण्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱया मशीनवर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. सोलर वॉटर हिटर्सवरही 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. याआधी पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.
हॉटेल रुम्स, आरोग्यसेवा महागणार
रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्याशिवाय, जैव-वैद्यकीय कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱया प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. तसेच प्रतिदिवस एक हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे असणाऱया हॉटेल रुम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. सध्या, 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या हॉटेलच्या खोल्यांवर जीएसटी आकारला जात नव्हता.
शैक्षणिक वस्तूंनाही महागाईची झळ
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने पिंटिंग-ड्रॉईंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉईंग-मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाईफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. सरकारने ब्लेड, कागदी कात्री, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटेरी चमचे, स्किमर आणि केक सर्व्हिस इत्यादींवर जीएसटी वाढवला आहे. आता त्यावर 18 टक्के दराने जीएसटी आकारला जाईल.
बिझनेस क्लासचा प्रवास महाग
आत्तापर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा, बागडोगरा येथून निघणाऱया विमानांची सेवा करमुक्त होती. पण आता फक्त इकॉनॉमी क्लाससाठी जीएसटी आकारला जाणार नाही. बिझनेस क्लासच्या विमान प्रवासासाठी 18 टक्के दराने जीएसटी आकारला जाणार असल्याने बिझनेस क्लासचा प्रवास महागणार आहे.
गोदामात माल ठेवणेही करप्राप्त
गोदामातील ड्रायप्रुट्स, मसाले, कोपरा, गूळ, कापूस, ताग, तंबाखू, तेंदूपत्ता, चहा, कॉफी इत्यादींच्या साठवणुकीच्या सेवा आतापर्यंत करमुक्त होत्या. या सेवाही आता कराच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत. आता 12 टक्के दराने कर आकारला जाणार आहे.