प्रतिनिधी/ पर्वरी
येथील विद्या प्रबोधिनी शाळेजवळ शनिवार दि. 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजण्य़ाच्या सुमारास एका चालत्या कारला अचानक आग लागली. अग्निशामक दलाचे जवानांनी आग आटोक्यात आणीपर्यंत कार जळून खाक झाली.
पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शनिवारी सायंकाळी होंडा कार क्रमांक डीएल-3- सीसीके- 2652 ही तोर्डाहून पणजीच्या दिशेने जात होती. पर्वरी येथे विद्याप्रबोधिनी शाळे जवळ आली असता अचानक पेटली. कारमध्ये असलेल्या संजीत वाई व आणखी एक व्यक्तीने प्रसंगधान राखून गाडीतून उडी घेउढन जीव वाचविला.
अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा फ्ढवारा करून आग आटोक्यात आणली. पर्वरी पोलीस स्थानकाचे हवालदार गिरीश राउळ यांनी घटनास्थळी जावून अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास पर्वरी पोलीस करीत आहेत.