Tarun Bharat

प्रणॉय विजयी, साई प्रणित, समीर यांचे आव्हान समाप्त

Advertisements

वृत्तसंस्था/ जकार्ता  ( मलेशिया )

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या मलेशिया खुल्या सुपर 750 दर्जाच्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एचएस प्रणॉयने कडवा संघर्ष करीत दुसरी फेरी गाठली तर बी. साई प्रणित आणि समीर वर्मा यांचे पुरूष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.

मंगळवारी या स्पर्धेतील झालेल्या पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात एचएस प्रणॉयने इंडोनेशियाच्या डॅरेन ल्यूचा 21-14, 17-21, 21-18 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित अँथोनी जिनटींगने भारताच्या साई प्रणितचा 21-15, 19-21, 21-9 अशा गेम्समध्ये 50 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. दुसऱया सामन्यात इंडोनेशियाच्या आठव्या मानांकित जोनातेन ख्रिस्टीने भारताच्या समीर वर्मावर 21-14, 13-21, 21-5 अशी मात करत विजयी सलामी दिली. महिला दुहेरीमध्ये भारताच्या अश्विनी पोनाप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. जपानच्या नामी मात्सुयामा आणि चिचारू शिदाने अश्विनी पोनाप्पा व एन सिक्की रेड्डी यांचा 21-15, 21-11 असा पराभव केला.

Related Stories

गावसकरांचे असेही ‘अर्धशतक’…आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सुवर्णमहोत्सव!

Patil_p

हॉलंडचे नेतृत्व पीटर सिलेरकडे

Patil_p

महामारीचा क्रीडा अर्थकारणावर सर्वाधिक परिणाम

Patil_p

मदनलाल, गंभीर नवे सीएसी सदस्य

Patil_p

राष्ट्रकुल क्वीन्स बॅटन रिले जानेवारीत

Patil_p

जोकोविचचे ‘कॅलेंडर स्लॅम’चे स्वप्न भंगले

Patil_p
error: Content is protected !!