साबांखामंत्री नीलेश काब्राल यांचे प्रतिपादन : चंदेरी महोत्सवाचे शानदार उद्घाटन
कुडचडे : चंदेरी महोत्सवाने आकाशात झेप घ्यावी. हे दयानंद कला केंद्राच्या संस्थापकनी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यात कुडचडय़ातील जनतेचे सहकार्य अत्यंत आवश्यक असून चंदेरी महोत्सव गोव्याचे भूषण आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सहाव्या चंदेरी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.
कुडचडेचा सर्वागीण विकास हेच आपले ध्येय हे शहर सुशोभित स्वच्छ ठेवणे, येथे पर्यटकांना आकर्षित करणारी साधनसुविधा निर्माण करणे जेणेकरून भविष्यात लोक या शहराकडे एक आदर्श म्हणून पाहतील, अशी भावनाही काब्राल त्यांनी व्यक्त केली.
चंदेरी राष्ट्रीय महोत्सवात सामील
चंदेरी महोत्सवाचे कार्याध्यक्ष मोतू नाईक यांनी हया महोत्सवाच्या आयोजनाच्या पाश्वभूमीवर बोलताना महोत्सवाची उत्तरोत्तर घोडदौड कशाप्रकारे, कोणामुळे झाली ह्याचा एकंदरीत आढावा घेतला. ते म्हणाले की आज चंदेरी महोत्सव कुडचडय़ाच्या पुरती मर्यादित राहिली नसुन हा महोत्सव राष्ट्रीय प्रवाहात समिल झाला आहे आणि पुढील काही वर्षात देशातील फिरत्या वर्तुळात हयाची नोंद होण्यास वेळ लागणार नाही.
यावेळी रंगमंचावर उपाध्यक्ष सुभाष नाईक, युवा उद्योजक वरूण कुडचडकर, लक्षमण मडगावकार, मोहनदास देसाई, मनोहर नाईक, संतोष सावर्डेकर व इतर उपस्थित होते. शोभायात्रेत नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात सहभागी होऊन पाहुण्यांचे व्यासपिठाकडे मिरवणूकीने स्वागत केले.
उदघाटन सोहळय़ात पाहुण्याचे दयानंद कला केंद्राच्याजे÷ कलाकार आनंदी नाईक याच्या नेतृत्वाखाली वनिता, अनिता, विश्वमाला बबिता, अनाया, त्रिशा, अनुजा यांनी स्वागत गीत सादर केले. तदनंतर गुजरात व गोवा कला पथकाचे नृत्य कार्यक्रम झाले. शेवटी नवीन खांडेकर यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन बंटी उडेलकर यांनी केला.