चिकनप्रेमींना फटका : दर कमी कधी होणार, याकडेच लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर परिसराबरोबरच ग्रामीण भागातही चिकनचा दर भडकला आहे. हा दर प्रतिकिलोस 280 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. बॉयलर कोंबडय़ांच्या आवकेत घट झाल्याने चिकन विपेत्यांना कोंबडय़ा वाढीव दराने मिळू लागल्या असून याचा फटका चिकनप्रेमींना सोसावा लागत आहे. मागील महिना ते दीड महिन्यापासून हा दर वाढला असून तो कमी कधी होणार याकडे साऱयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
दर वाढल्याने जिभेवर आवर घालण्याची वेळ आता चिकनप्रेमींवर आली आहे. महिन्याभरापूर्वी चिकनचा दर 150 ते 160 रुपये होता. आता हा दर 280 प्रतिकिलो झाला आहे. विक्रेत्यांना याचे कारण विचारले असता सध्या कोंबडय़ांची आवक मंदावली आहे. यामुळे कोणत्याही पद्धतीने कोंबडय़ा मिळविण्याची स्पर्धा सुरू झाली असून विपेते वाटेल तो दर आकारू लागले आहेत, अशी माहिती चिकन विपेत्यांनी दिली आहे.
आवक आणखी मंदावल्यास हा दर आणखी वाढण्याची शक्मयता आहे. मटणचा दर प्रतिकिलोस 640 रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे माफक दरासाठी मांसाहारीप्रेमी चिकनकडे मोर्चा वळवत होते. मात्र आता चिकनही दरवाढीच्या चक्रात अडकू लागल्याने चिकनप्रेमींची गोची होऊ लागली आहे. हे दर कधी कमी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
खाद्य, वाहतूक खर्च
वाढल्यामुळे दरात वाढ महागाईची झळ आता चिकनलासुद्धा बसली आहे. पूर्वी 150 ते 180 रुपयांना किलो मिळणारे चिकन मंगळवारी 280 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. कोंबडय़ांना लागणारे खाद्य, वाहतूक, पक्ष्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे चिकनचे दर वाढले असल्याची माहिती मिळाली आहे.