मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadanvis) यांनी आज दुपारी मुंबई-नागपूर सुपरकम्युनिकेशन हायवेवर (समृद्धी महामार्ग) (Samruddhi hiway) चाचणी फेरी घेतली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओ आणि इमेजमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वता काळी मर्सिडीज चालवत असून बाजूला मुख्यमंत्री बसले आहेत. नागपूर ते शिर्डी या मुंबई- नागपूर सुपरकम्युनिकेशन हायवेच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी उद्घाटन होणार असून या एक्स्प्रेसवेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) यांचे नाव देण्यात आले आहे.


यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “या महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे ही अभिमानाची बाब आहे.” दरम्यान, एक्सप्रेसवेचे विकासक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) याच्यानुसार, एक्सप्रेसवेच्या आजूबाजूच्या जमिनी खाजगी कंपन्यांना व्यावसायिक वापरासाठी कोणत्याही निविदा किंवा लिलावाशिवाय उपलब्ध होतील. या जमिनींची किंमत एमएसआरडीसी ठरवेल. समृद्धी महामार्ग एकुण 700 किमी लांबीचा आहे. नागपूर ते शिर्डी हा 520 किमीचा रस्ता 11 डिसेंबरपासून वाहतुकीसाठी अंशतः खुला असेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महामार्गाजवळील भागांच्या विकासामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यातून नवीन शहरे वसवण्याचा मार्गही मोकळा होईल