Tarun Bharat

आक्षेपार्ह घोषणांसाठी मुलाला मिळाले होते प्रशिक्षण

Advertisements

पीएफआय रॅली वाद : न्यायालयात पोलिसांचा दावा

वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम

काही दिवसांपूर्वी केरळमध्ये कट्टरवादी इस्लामिक संघटना पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या रॅलीमध्ये 11 वर्षीय मुलगा चिथावणीयुक्त नारे देत असल्याचे दाखविणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी आता नवा खुलासा झाला आहे. संबंधित मुलाला रितसर अशा आक्षेपार्ह घोषणा देण्याचे प्रशिक्षण मिळाले होते. हे काम पीएफआय आणि त्याच्याशी निगडित संघटना एसडीपीआयच्या नेत्यांनी केले होते. याकरता मुलाच्या वडिलांनी देखील मदत केली होती. ते देखील पीएफआयचे सक्रीय सदस्य आहेत, असा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी या मुलाच्या पित्याला यापूर्वीच अटक केली आहे. मुलाला नारे देण्याचे प्रशिक्षण मिळवून देण्यात पीएफआय आणि एसडीपीआयच्या पदाधिकाऱयांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पीएफआयच्या पल्लुरथी विभागाचे अध्यक्ष शमीर आणि एसडीपीआयच्या थ्रिप्पुनिथुरा क्षेत्राचे सचिव सुधीर एनवाय यांना आरोपी केले आहे. सुधीर हा संबंधित मुलाच्या पित्याचा मित्र आहे. त्याचे मुलाच्या घरी वारंवार येणे-जाणे होते. सुधीरने मुलाला या आक्षेपार्ह नारे देण्यासाठी चिथावणी दिली होती असे पोलिसांनी म्हटले आहे.

अशाप्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये मुलांच्या वापरावर बंदी आहे. तरीही त्याच्या वडिलांसमवेत आरोपींनी सांप्रदायिक शत्रुत्व निर्माण करून दंगल भडकविण्याच्या हेतूने मुलाला चिथावले होते असे अहवालात नमूद आहे. 21 मे रोजीच्या पीएफआयच्या रॅलीचा एक व्हिडिओ मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाला होता. यात एक व्यक्तीच्या खांद्यावर बसलेला मुलगा प्रक्षोभक नारे देताना दिसून येतो. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांना अटक केली आहे. 6 वीत शिकणाऱया मुलाच्या या वडिलांना पोलिसांनी शनिवारी एर्नाकुलम जिल्ह्य़ातील पल्लूरथीमध्ये अटक केली होती.

Related Stories

सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

datta jadhav

देशात 24 तासात 44,879 रुग्ण

Omkar B

केंद्रीय पोलीस दलात 36 हजारांहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav

अस्वस्थ वाटू लागल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद रूग्णालयात दाखल

Abhijeet Shinde

ऍमस्टरडॅमध्ये 3डी प्रिंटेड स्टील ब्रिज

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये ‘डाव्यां’च्या मतांवर लक्ष

Patil_p
error: Content is protected !!