धुलिवंदनासाठी शहर सज्ज : बालचमू, तऊणाईत उत्साह
बेळगाव : धुलिवंदनासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. यानिमित्ताने रंगोत्सवाचा जल्लोष मंगळवारी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तऊणाईंचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. पिचकारी, टिमक्मया वाजविण्यात बालचमू दंग झाले आहेत. तर रंगोत्सवासाठी तऊणाईची लगबग पहावयास मिळत आहे. रंगोत्सवासाठी शहरातील चव्हाट गल्ली, गवळी गल्ली, पांगुळ गल्ली आदी ठिकाणी मंडप व शॉवरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी शहरात तऊणाईचा जल्लोष दिसून येणार आहे. गत दोन वर्षात कोरोनामुळे धुलिवंदनाच्या उत्साहावर पाणी फेरले होते. मात्र यंदा धुलिवंदन धुमधडाक्मयात साजरे करण्यासाठी तऊणाईचा उत्साह वाढला आहे.
बाजारपेठेत गर्दी
धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात वेगवेगळे कलर, सुगंधी कलर आणि नैसर्गिक रंग व पावडरना मागणी वाढली होती. कार्टूनसह पिचकाऱ्या, पांढरे सदरे, कुर्ते आदीची खरेदी वाढली होती. त्यामुळे सोमवारी बाजारपेठेलादेखील धुलिवंदनाचा रंग चढला होता. रंगोत्सवासाठी मंगळवारी बाजारपेठ अर्धादिवस बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवारीच नागरिकांनी खरेदीला पसंती दिली. विशेषत: रंगोत्सवासाठी लागणाऱ्या विविध रंगांची खरेदी अधिक प्रमाणात झाली.
सामाजिक संघटनांचे आवाहन
मंगळवारी धुलिवंदनादिवशी बालचमू आणि तऊणांनी रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंगांचा वापर करावा, आरोग्याला बाधक असलेल्या रंगाचा वापर करू नये, असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले आहे. जल्लोषाच्या भरात कोणताही रंग उडविला जातो. त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळे तऊणांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
अश्वत्थामा मंदिरासमोर सामूहिक लोटांगण
मंगळवार दि. 7 रोजी शहरात धुलिवंदनानिमित्त रंगोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरासमोर सामूहिक लोटांगण घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी पांगुळ गल्लीत तयारी करण्यात आली आहे.