Tarun Bharat

शहर पोलिसांनी 17 जणांच्या मुसक्या आवळल्या

अटक वॉरंट बजावलेल्यांविरोधात ऑपरेशन सर्च मोहिम

प्रतिनिधी/ सातारा

शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना न्यायालयाचे पकड वॉरंट आहे अशा गुन्हेगारांना शोधून त्यांना अटक करण्यात आल्याची मोहिम शहर पोलिसांनी राबवल्याची माहिती बुधवारी दिली. तब्बल 13 गुन्हेगारांसह 4 विधीसंघर्ष बालक असे 17 जणांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सर्च मोहिमेची संकल्पना शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांची असून पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही कारवाई केली.

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कोर्ट केसकामी कोर्टात हजर न राहणाऱया आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलले आरोपींचे पकड वॉरंट प्राप्त झाल्याने त्या आरोपींना पकडण्याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस जवान यांची बैठक घेऊन एकाच वेळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहिम राबवण्याच्या सूचना दिल्या. त्याकरता पाच पथके तयार करण्यात आली. त्या पथकास मार्गदर्शन करुन त्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने वॉरंट असलेल्या आरोपींची माहिती घेऊन शोध मोहिम घेतली.

यामध्ये 17 जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यामध्ये राहुल बाळकृष्ण बनसोडे (वय 42, रा. रविवार पेठ), स्वप्निल राहुल बनसोडे (वय 26, रा. रविवार पेठ), संतोष अशोक पवार (वय 33, रा. क्षेत्रमाहुली), अनिल बापुराव मोहिते (वय 32, रा. लक्ष्मीटेकडी), श्रीकांत मोहन गडाकुंश (वय 31, रा. अष्टविनायक अपार्टमेंट गोरखपूर पिरवाडी), प्रकाश किसन वायफळकर (वय 58, रा. गोडोली), सुनील शिवाजी दळवी (वय 35, रा. माऊली बंगला काळेश्वरी कृष्णानगर), ईश्वर दत्ता सावंत (वय 30, रा. शनिवार पेठ), प्रीतम प्रकाश महाडिक (वय 35, रा. नवीन एमआयडीसी), अक्षय राजेंद्र रसाळ (वय 24, रा. क्षेत्रमाहुली), शुभांगी प्रकाश मुळे (वय 37, रा. कृष्णकंज अपार्टमेंट बी. विंग गोडोली), मंदा हेंमत भोकरे (वय 56, रा. देशमुख कॉलनी करंजे), अक्षय लालासो पवार (वय 26, रा. खंडोबाचा माळ) व चार विधीसंघर्ष बालके ताब्यात घेतली आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस अधीक्षक शीतल खराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे, राजेश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती चाँदणी मोटे, सहाय्यक पोलीस फौजदार एस. आर. दिघे, हवालदार अरुण दगडे, विजय गायकवाड, देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, अनिल सावंत, पकंज ढाणे, अभय साबळे, बाबा भिसे, निलेश घोडके, सागर गायकवाड, प्रमोद सोनावणे, सचिन देवकर, प्रल्हाद चिरफरे, राजू कांबळे, अंबादास केकाटे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, क्रांती निकम, होमगार्ड धीरज जाधव, लक्ष्मीकांत तरडे, शर्मिला सावंत यांनी केलेली आहे.  

तर त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात येईल

जर यापुढे न्यायालयाने आरोपीस, साक्षीदार यांना समन्स काढून जर ते न्यायालयात हजर झाले नाही तर न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढले तर त्यांना अटक करुन पोलीस कोठडीत ठेवण्यात येईल. तरी संबंधितांनी न्यायालयाच्या केसकामी दिलेल्या तारखेस हजर रहावे, असे आवाहन सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले आहे.

Related Stories

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यी वसतिगृहाला छ.शाहू महाराजांचे नाव देण्याची मागणी

Abhijeet Khandekar

जतमध्ये होमक्वारंनटाईन मधील तरुणाचा मृत्यू

Archana Banage

दिवाळी संपताच नगरपंचायत निवडणूक जाहीर

Patil_p

धक्कादायकः तब्बल 38 बळी

Patil_p

धक्कादायक : कळंबा कारागृहातील ३७ कैद्यांना कोरोनाची लागण

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात आज १ बळी तर ८७ पॉझिटिव्ह

Archana Banage