Tarun Bharat

सीएनजी इंधनावरची ग्लान्झा लवकरच बाजारात येणार

Advertisements

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टोयोटाने आपली नवी ग्लान्झा ही सीएनजी इंधनावरील कार भारतीय बाजारात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी सदरची कार एस, जी आणि व्ही या वेरिएंटमध्ये सादर करणार असल्याची माहिती आहे.

यावर्षी मार्चमध्ये टोयोटाकडून ग्लान्झा फेसलिफ्ट भारतीय बाजारात उतरविली गेली होती. याचेच आता सीएनजी इंधनावर आधारित मॉडेल लवकरच दाखल केले जाणार आहे. ही पहिली वहिली प्रिमियम हॅचबॅक प्रकारातील गाडी असणार असून 1.2 लिटर के सीरीज डय़ुएल जेट, डय़ुएल व्हीव्हीटी, पेट्रोल इंजिन यात असणार आहे. पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्ससह येणारी ही गाडी 1 किलो ग्रॅम सीएनजी मागे 25 कि. मी. इतके मायलेज देणार आहे. या गाडीच्या किमतीबाबत मात्र खुलासा करण्यात आलेला नाही. टोयोटा ग्लान्झा पेट्रोल कारची किंमत 6.59 लाख ते 9.99 लाख (एक्स शोअरुम) इतकी आहे. याच्या जवळपास किंमत असू शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. सदरच्या नव्या कारची स्पर्धा मारुतीच्या बलेनो, टाटाच्या अल्ट्रोज आणि हय़ुंडाईच्या आय-20 बरोबर होणार आहे.

Related Stories

टीयागोची सीएनजी दिवाळीला बाजारात

Patil_p

होंडाची नवी अमेझ कार बाजारात

Patil_p

पोलो आणि वेंटोचे उत्पादन होणार बंद

Patil_p

होंडा सिटी इलेक्ट्रिकचे उत्पादन सुरु

Patil_p

आघाडीवरच्या कार विक्रीत मारुतीचाच डंका

Patil_p

बजाजची ‘चेतक’ 14 जानेवारीला होणार लाँच

prashant_c
error: Content is protected !!