Tarun Bharat

दिवसेंदिवस व्यक्तीच्या शरीराचा बदलतोय रंग

Advertisements

वैद्यकीयशास्त्रासाठी देखील ठरला रहस्य

प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा स्वतःचा असा रंग असतो, उन्हात राहिल्याने रंगावर किंचित फरक पडत असला तरीही तो कायमस्वरुपी बदल नसतो. माणसाच्या त्वचेचा रंग मूळपदावर येत असतो. परंतु कुणाचा रंग  गडद होत असल्यास हा प्रकार त्रासदायक असतो.

लुसियानात राहणारा एक असाच रुग्ण वैद्यकीय शास्त्रासाठी आव्हान ठरला ओ. या रुग्णाच्या शरीराचा रंग हळूहळू गौरवर्णातून सावळा होत आहे. यामागील कारण अद्याप डॉक्टरांना समजू शकलेले नाही. 34 वर्षीय टायलल मोंक नावाच्या व्यक्तीचा रंग पूर्वीच्या तुलनेत खूपच बदलला आहे. अँटी डिप्रेशनच्या औषधांमुळे हे घडल्याचा त्याचा दावा आहे.

पेशाने पेस्ट कंट्रोल फील्ड इन्स्पेक्टर असणाऱया टायलर मोंकला डिप्रेशन आणि तणावाची समस्या होती. त्याने जानेवारी 2021मध्ये मनोचिकित्सकाचा सल्ला घेतला आणि त्याला प्रोझॅक नावाचे अत्यंत सर्वसाधारण अँटी डिप्रेशनचे औषध देण्यात आले. या औषधाद्वारे त्याच्या तणाव अन् नैराश्यात कुठलाच बदल झाला नाही, परंतु काही महिन्यांनी त्याला वेगळाच बदल दिसून येऊ लागला. दोन मुलांचा पिता असलेल्या टायलरच्या त्वचेचा रंग गडद होऊ लागला. आता त्याच्या त्वचेच्या रंगातील बदल स्पष्टपणे दिसून येतो.

डॉक्टरही अवाप्

डॉक्टरांना देखील यामागील रहस्याची उकल करता आलेली नसल्याचे टायलरचे म्हणणे आहे. पूर्वी तो याला टॅनिंग समजत होता, परंतु उन्हापासून वाचल्यावरही रंग गडद होणे सुरूच राहिले. त्याच्या या पोस्टवर लोकांनी विविध प्रकारच्या कॉमेंट्स केल्या आहेत.

Related Stories

खराब रस्त्यांवरून अधिकाऱयांना सुनावले

Patil_p

पंजाबमध्ये 845 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 26 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

संस्कृत आणि तमिळ वाद व्यर्थ; सोडवण्यासाठी इतर अनेक मुद्दे- सोनु निगम

Abhijeet Khandekar

उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल

Omkar B

बिहार : भाजप कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Tousif Mujawar
error: Content is protected !!