दि. 7-8-2022 ते 13.8.2022 पर्यंत
मेष
या आठवडय़ामध्ये एखादी गोष्ट विसरल्यामुळे नुकसान होण्याची शक्मयता आहे. याच बरोबर एखादी वस्तू गहाळ होणे किंवा हरवणे यासारखी घटनाही घडू शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीत भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. पैशांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसामान्य असेल. कुटुंबातील व्यक्तीकरता वेळ काढावा लागेल. एखादा जुना आजार बरा होण्याच्या मार्गावर आहे.
काळी वस्तू दान द्यावी
वृषभ
तुमच्या चांगुलपणाचा फायदा लोक उचलतील आणि यात गैर काहीच नाही पण यात तुमचे नुकसान होऊ देऊ नका. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. कुटुंबात एखादा सदस्य हट्टीपणा करेल याचा त्रास होऊ शकतो. कागदोपत्री व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनामध्ये चढ-उतार असतील पण नाते घट्ट होण्याकरतासुद्धा प्रयत्न कराल. प्रेमी युगुलांनी एकमेकाला स्पेस द्यावी.
हिरवा हातरुमाल जवळ ठेवा
मिथून
या आठवडय़ामध्ये प्रत्येक काम नियोजनपूर्वक करणे गरजेचे आहे. घाईगडबडीत केलेल्या कामांमुळे नुकसान होऊ शकते. नोकरदार वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. परिवारातील सदस्यांच्या सहयोगामुळे एखादे अवघड काम पूर्ण होईल. तब्येतीच्याबाबतीत हा आठवडा सर्वसामान्य असेल. कुठल्याही प्रकारे कर्ज काढण्यापासून वाचणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात ताण तणाव होऊ शकतो.
गरजू वृद्ध व्यक्तीला जीवनावश्यक वस्तूचे दान करावे.
कर्क
काही कामे होता होता राहिल्यामुळे चिडचिड होऊ शकते. व्यवसाय-धंद्यामध्ये नवीन संधी प्राप्त होतील पण त्या संधींना प्रत्यक्षात उतरवण्याकरता कष्ट जास्त करावे लागतील. परिवारातील एखाद्या सदस्याच्या वागण्याचा राग येऊ शकतो. या आठवडय़ात तब्येत नाजूक राहण्याची शक्यता आहे. नोकर वर्गाने गटबाजीपासून दूर राहावे. प्रेमीनी एकमेकांकरता वेळ काढावा.
तुळशीचे पान जवळ ठेवावे
सिंह
या आठवडय़ामध्ये तुमच्या कामामुळे किंवा तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे तुमचे इतर सहकारी तुमच्यावर ईर्षा करू शकतात. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. या आठवडय़ात तुमचा कल साहित्य, कला, संगीत यासारख्या विषयांकडे जास्त असेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कामे वेळेवर पूर्ण झाल्याने समाधान वाटेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. वैवाहिक जीवनात समाधान असेल.
तुळशीचे पान जवळ ठेवावे.
कन्या
स्वभावामध्ये उदासी येण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही जी कामे हातात घ्याल त्या कामांबद्दल संपूर्ण विचार करूनच मग त्या कामात हात घालावा. वैवाहिक जोडीदाराबरोबर किंवा व्यवसायातील भागिदाराबरोबर वाद-विवाद होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये तणाव येण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या लहान सहान तक्रारी त्रास देऊ शकतात. परिवारातील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा.
सरकारी जमिनीवरील झाडांना पाणी घालावे.
तूळ
जे काही निर्णय घ्यायचे असतील ते चार चौघांना विचारून आणि पूर्ण विचार करून घ्या कारण त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो. ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करता त्यांच्याशी व्यर्थ वाद होण्याची शक्मयता आहे. घरासाठी वस्तू खरेदी कराल. महिन्याचे आर्थिक नियोजन ढासळू शकते. तब्येत सर्वसामान्य असेल. मित्रांबरोबर एखाद्या ठिकाणी पार्टीला जाऊ शकता.
सुगंधी अत्तर दान करावे.
वृश्चिक
हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. एखादा दिवस भरपूर कामे येतील आणि एखाद्या दिवशी अजिबात काम नसेल. वैवाहिक जोडीदाराच्या एखाद्या हट्टामुळे मनस्ताप होऊ शकतो. नातेवाईक तुमचा आर्थिक फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील पण तसे होऊ देऊ नका. छोटे मोठे आजार सोडले तर तब्येतीविषयी फारशी चिंता करण्याची गरज नाही. प्रेमसंबंधात दुरावा संभवतो.
बेलाच्या झाडाला पाणी घालावे
धनु
क्रोध आणि आळस यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करावा. बरोबरच्या माणसांबरोबर वागताना काही प्रसंग असे येऊ शकतात की ज्यामुळे तुमचा ताबा सुटेल. अशावेळी मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणतेही काम करत असताना पुढचा विचार करून मगच कृती करा. नोकरीच्या ठिकाणी त्रास संभवतो. व्यावसायिकांना जास्त कष्ट करण्याची गरज आहे.
हंसाची जोडी घरी ठेवावी
मकर
काही आनंदी घटना घडतील. चांगल्या माणसांचा सहवास प्राप्त होईल. व्यवसाय किंवा नोकरीबद्दल महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. कुटुंबातील व्यक्तींमध्ये सुसंवाद घडेल. एकमेकांच्या सल्ल्याने घराबद्दल एखादा निर्णय घ्याल. तब्येत ठीकठाक राहील. आर्थिक प्राप्ती सर्वसामान्य असेल. एखाद्या मित्राबद्दल वाईट बातमी कळू शकते. प्रेमींनी एकमेकांशी बोलताना वाद टाळावा.
कमळ फुल घरी ठेवावे.
कुंभ
कामासाठी प्रवास घडू शकतो. नवीन ओळखी होतील आणि त्यातून नवीन संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे. तब्येतीला मात्र जपावे लागेल. हवामानातील बदल हा तुम्हाला तितकासा मानवणारा नाही. कौटुंबिक गोष्टी इतरांशी बोलू नका. आर्थिक आवक उत्तम असेल. पुढच्या काही महिन्याकरता आर्थिक नियोजन कसे असावे याचा विचार कराल. दुसऱयांकरता कष्ट करावे लागतील.
वस्त्र दान करावे
मीन
कष्टाचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी ठेवावी. एखादे काम पूर्ण करून घेण्याकरता साम-दाम-दंड-भेद वापरून प्रयत्न करा. वैवाहिक जोडीदाराशी असलेले मतभेद आणि वाद कमी होण्याची शक्मयता आहे. प्रेमींनी लांबच्या ठिकाणी जाणे टाळलेले बरे. कष्टाच्या मानाने आर्थिक प्राप्ती तितकीशी न झाल्याने मन उदास होण्याची शक्मयता आहे.
पांढरा गुलाब जवळ ठेवा
टॅरो उपायः
वाईट वेळ चालली असेल तर जवळची माणसेसुद्धा तोंड फिरवतात. अशावेळी एक असोला पाणीदार नारळ घेऊन आपल्या डोक्मयावरून एकवीस वेळा फिरवावा आणि एखाद्या धार्मिक स्थळी तो जाळावा. हा उपाय 5 शनिवार किंवा मंगळवार करावा.