दिनांक 6-11-2022 ते 12.11.2022
मेष
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असा टॅरोचा संदेश आहे. आठवडय़ाची सुरुवात जरी मंद असली तरी आठवडय़ाच्या मध्यानंतर कामांना गती मिळेल. या आठवडय़ात तुमच्या बऱयाच कामांसाठी इतरांची गरज लागेल त्यामुळे लोकांना नीट मॅनेज करणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्टीने हा आठवडा उत्तम असेल. तब्येतीच्या बाबतीत काळजी करण्याचे कारण नाही. कौटुंबिकदृष्टय़ा या आठवडय़ामध्ये कॉम्प्रमाईज जास्त करावे लागेल.
सुवासिक फुले जवळ ठेवावी.
वृषभ
इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःच्या गरजा ओळखून प्रयत्न वाढविण्याची गरज आहे असा टॅरोचा संदेश आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या कामांकरता प्रवास घडू शकतो. कुटुंबातील वातावरण नेहमीपेक्षा अधिक सुखद असेल. या आठवडय़ात तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक गरजा भागवण्याकरता जास्त श्रम करावे लागू शकतात. प्रेम प्रसंगात छोटय़ामोठय़ा तक्रारी येतील. भावनांवर नियंत्रण ठेवावे.
पिंपळाचे एक पान जवळ ठेवा.
मिथुन
नवीन नातेसंबंध निर्माण होतील पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजून घेणे आणि नाती टिकवणे हे आवश्यक आहे असा टॅरेचा संदेश आहे. जे काम तुम्ही करत आहात त्या कामासाठी योग्य अशी माणसे तुम्हाला भेटतील ज्यामुळे पुढे जाण्यासाठी चांगली मदत होईल. भौतिक गोष्टींमध्ये तुम्हाला चांगले सुख लाभेल. आर्थिक बाबतीमध्ये दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱयांचा वैताग येऊ शकतो,
मजुरांना दूध वाटावे.
कर्क
महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर बोलत असताना अत्यंत सांभाळून बोलावे लागेल. नाहीतर होणारे काम अवघड होऊन बसेल असा टॅरो संदेश आहे. आपण भले की आपले काम झाले या प्रकारचा एटीटय़ूड ठेवल्यास कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास होणार नाही. या आठवडय़ामध्ये एका महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होऊन त्या व्यक्तीमुळे काम होईल. आर्थिक बाजू चांगली असेल. प्रवास करताना तब्येतीला सांभाळा.
अशोकाची पाच पाने जवळ ठेवावी.
सिंह
या आठवडय़ामध्ये तुम्ही एका विशेष कामांमध्ये गढून जाल आणि तुम्हाला असे वाटेल की तुम्हाला इतरांची आवश्यकता नाही. तुमच्या आतला आवाज जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला नक्की काय करायचे आहे हे लक्षात येईल असे टॅरोचे म्हणणे आहे. आर्थिक बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची रिस्क घेणे नुकसानदायक ठरू शकते. आरोग्याची काही विशेष तक्रार असणार नाही. कुटुंबातील व्यक्ती सहकार्य करतील.
आवळय़ाच्या झाडाला पाणी घालावे.
कन्या
या आठवडय़ामध्ये एखाद्या गोष्टीची किंवा कामाची परिपूर्णता तसेच नवीन गोष्टीची सुरुवात होईल. जुन्या गोष्टीचा शेवट हा चांगला किंवा वाईट कसाही असू शकतो असे टॅरोचे म्हणणे आहे. जे लोक संतती करता प्रयत्न करत आहेत त्यांना शुभसंकेत आहेत. जर एखादी गोष्ट हरवली किंवा एखाद्या गोष्टीपासून तुम्ही दूर गेला तरी खेद मानण्याची आवश्यकता नाही पुढे खूप आश्वासक काळ आहे. सोबत काम करणाऱया लोकांपासून सावध रहा.
लाजाळूची रोपे पाण्याजवळ ठेवावी.
तूळ
तुम्ही स्वतःवरती पूर्ण केंदीत व्हावे. आत्मसंवाद साधावा. या आठवडय़ामध्ये बऱयाच गोष्टींच्या बाबतीत कॉम्प्रमाईज करावे लागू शकते. सध्या तुम्ही अशा कामांमध्ये गुंतला आहात की ज्यामध्ये भरघोस यश मिळण्याची शक्मयता थोडी कमी आहे. पण अशाच वेळी एखादी व्यक्ती नवीन प्रोजेक्ट घेऊन येऊ शकते किंवा व्यवसायवृद्धीच्या नवीन योजना सांगू शकते. त्या व्यक्तीचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकावे. आरोग्याला सांभाळा.
पक्ष्यांना दाणे घाला.
वृश्चिक
नवीन नातेसंबंध जोडण्याकरता हा आठवडा विशेष महत्त्वपूर्ण ठरेल. नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील आणि त्यातून फायदा होईल. याचबरोबर या आठवडय़ात कामाचा त्रागा होऊ शकतो. ताणतणाव आणि नैराश्य यापासून दूर राहा असा संदेश आहे. कामाला उशीर झाला तरी चिडून न जाता विचारपूर्वक निर्णय घ्या. छोटय़ाशा कारणावरून कुटुंबात भांडण होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत आर्थिक बाजू कमकुवत वाटेल.
भटक्या कुत्र्यांना खाणे द्यावे.
धनु
एखाद्या चुकीमुळे किंवा मार्गदर्शनामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कोणावर किती विश्वास ठेवावा याचे भान राखा असा टॅरोचा संदेश आहे. या आठवडय़ात महत्वाकांक्षी कामे हातात घ्याल. एखादी समजूतदार चांगल्या आणि वाईट याचे योग्य ज्ञान असलेली स्त्री तुम्हाला मदत करेल. कुटुंबातील व्यक्तींनी सहकार्य केल्यामुळे कामे पूर्ण होतील. आरोग्याला सांभाळावे लागेल. व्यवसाय वाढीकडे लक्ष द्याल.
गरजूला वस्त्र दान द्यावे.
मकर
या आठवडय़ामध्ये स्वतःच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सवयीबद्दल विचार केल्यास आणि सुधारण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल असा संदेश आहे. इतरांना दिलेला शब्द पाळणे आणि नातेसंबंध दृढ करणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील किंवा इतर श्रे÷ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. ज्यामुळे निर्णय घ्यायला मदत होईल. या आठवडय़ात तुम्ही अध्यात्माकडे झुकू शकता. आर्थिक बाजू समाधानकारक असेल.
पिंपळाची 7 पाने जवळ ठेवावी.
कुंभ
या आठवडय़ामध्ये कष्ट जास्त आणि मोबदला कमी असा अनुभव येऊ शकतो. तुमच्यावर नोकरी-व्यवसायात आणि कुटुंबात एकाच वेळी अनेक जबाबदाऱया पडू शकतात. भौतिक सुखाची प्राप्ती होईल पण तुम्हाला थोडी खिन्नता वाटू शकते. अशावेळी कोणाकडेतरी व्यक्त होणे गरजेचे आहे असा संदेश आहे. कामाच्या ठिकाणी वाद-विवाद आणि गुप्त कारस्थानांपासून सावध राहणे आवश्यक आहे. आपले श्रम वाया जाऊ नयेत याची काळजी घ्या.
तुळशीखालील माती जवळ ठेवावी.
मीन
या आठवडय़ात अडचणींवर मात कराल.पुढील होणाऱया शुभ घटनांचे संकेत मिळतील. सध्या तुम्हाला मानसिक अशांतता अनुभवावी असे वाटेल. तुम्ही नवीन गोष्टी शिकून घ्याव्यात ज्यामुळे भविष्यात फायदा होईल असा संदेश आहे. कामाला उशीर होणे किंवा कामाच्या ठिकाणी वेळेवर न पोहोचणे यामुळे अडचणीत सापडणार नाही याची काळजी घ्या. आर्थिकदृष्टय़ा काळजी करण्याचे कारण नाही. आरोग्याला सांभाळा.
पिवळा हातरुमाल जवळ ठेवावा.
टॅरो उपायः
संकटे नाहीत असा माणुसच नाही. प्रत्येकावर कधी ना कधी वाईट वेळ येतेच. अशा वेळी घाबरून न जाता प्रयत्न करावा. त्याबरोबरच हा उपाय देखील करून पहा. बुधवारी 7 प्रकारची धान्ये दान द्यावीत. नगरमोथा या वनस्पतीचे मूळ धारण करावे.