4-12ö2022 ते 10-12- 2022
मेष
कर्तृत्वाला बहार आणणारा आठवडा असेल पण संधी वाया जाऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या घटनेने मन विचलित होऊ शकते. आर्थिक बाबतीत काही ठिकाणी धोका पत्करावा लागेल. धोका फार मोठा असणार नाही याकडे लक्ष द्यावे. कुटुंबातील सदस्य तुमच्याकडे एखादी मागणी करू शकतात जी पूर्ण करण्याकरता तुम्हाला दुसऱयाची मदत घ्यावी लागेल. प्रेमसंबंधात थोडय़ा तडजोडी कराव्या लागतील.
पांढरी फुले दान द्यावीत.
वृषभ
नवीन गोष्टींची सुरुवात होण्याकरता काही जुन्या गोष्टी समाप्त व्हाव्या लागतात हे ध्यानी असू द्या. काही नवीन योजना हाती येण्याची शक्मयता आहे. व्यावसायिकांना कामे मिळवण्याकरता प्रवास करावा लागू शकतो. या सगळय़ामध्ये इतरांशी बोलत असताना वादावादी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्टय़ा सर्वसामान्य असा आठवडा असेल. कुटुंबातील ज्ये÷ व्यक्तीची काळजी वाटेल.
जोडीदाराला परफ्युम भेट द्या.
मिथुन
सगळय़ाच गोष्टी मनासारख्या होत नसतात पण घडणाऱया घटना पुढे येणाऱया चांगल्या काळाची सूचना देणाऱया असू शकतात. या काळात थोडे एकटे वाटू शकते. जवळच्या माणसांनी वेळेवर साथ न दिल्याने मनात थोडी निराशा येऊ शकते. या आठवडय़ात अनेकांना अनेक ठिकाणी तुमची गरज लागेल. यामध्ये
प्राधान्य महत्त्वाचे असेल. आर्थिक बाजू भक्कम असावी म्हणून अथक प्रयत्न करावे लागतील.
वापरलेले जुने कपडे दान द्यावे.
कर्क
एखाद्या समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. तुमचा मान सन्मान वाढेल अशा काही घटना या आठवडय़ात घडू शकतात. सामाजिक उपक्रमात तुमचे योगदान महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील व्यक्तींनी तुमचे मत विचारात घेऊन कामे केल्यामुळे साहजिकच तुम्हाला बरे वाटेल. या सगळय़ात मनात गर्वाचा लवलेश येऊ देऊ नका. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे यासाठी आर्थिक आवक वाढवण्याकडे लक्ष द्यावे.
केळीच्या झाडाला पांढरा धागा बांधावा.
सिंह
कामाच्या पसाऱयामुळे दमछाक होणार आहे. तब्येतीची हेळसांड करू नका. योग्य काळजी घेतली तर तक्रारी कमी होतील. एखादी जवळची व्यक्ती तुमच्याकडे मदतीची अपेक्षा करू शकते. ही मदत आर्थिक स्वरूपात असू शकते. योग्य तो निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी लोकांनी आपापली कामे योग्य प्रकारे न केल्याने तुमच्यावर जबाबदारी वाढू शकते.
काचेच्या पेल्यात खडे मीठ घालून घरी ठेवा
कन्या
हा आठवडा वादावादीकडे किंवा गैरसमजाकडे इशारा करत आहे. अशावेळी ज्येष्ठ व्यक्तीने दिलेला सल्ला कामी येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला काम करणारी माणसे तुमच्याविरुद्ध कट कारस्थाने करू शकतात. सावध राहणे शहाणपणाचे ठरेल. या आठवडय़ात पण याच वेळेला कन्फ्युजन होऊ शकते. हे करावे की ते करावे अशा मनःस्थितीत योग्य निर्णय घेणे अवघड जाईल.
डाव्या मनगटावर हिरव्या शाईने 641 आकडा लिहावा
तूळ
तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी मिळण्याचे अनेक प्रसंग या आठवडय़ात घडतील. कामाच्या ठिकाणी असलेल्या गुप्तशत्रूंच्या कारवाया बंद होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील एका सदस्याच्या कामासाठी वेळ खर्च करावा लागेल. आर्थिकदृष्टय़ा काहीसे निराशादायक वातावरण असले तरी पुढे मोठय़ा धनलाभाची शक्मयता आहे. बदललेल्या वातावरणाचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. प्रेमसंबंधात वृद्धी होईल.
पिंपळाला दूध मिश्रित पाणी घालावे.
वृश्चिक
सगळी कामे पूर्ण होतील पण थोडा धीर धरण्याची गरज आहे. या आठवडय़ात संयमाची परीक्षा घेतली जाईल असे संकेत आहेत. आर्थिक व्यवहार पूर्ण होण्यास वेळ लागेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहावे आणि सदस्यांमध्ये एकी राहावी यासाठी प्रयत्न करावे लागतील. तब्येतीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. काही जुन्या सवयी सोडल्यास आरोग्याच्या दृष्टीने फायदा होईल.
वैवाहिक जोडीदाराला सुगंधी फूल द्यावे
धनु
हा आठवडा जुन्या आठवणी, जुने सहयोगी, जुने मित्र यांच्या भेटीगाठींचा किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा असेल. पैशाच्या बाबतीत भाग्यवान असाल. नवीन ओळख झालेल्या एखाद्या माणसामुळे फायदा होण्याची शक्मयता आहे. लोकांच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी घडलेल्या घटनांचा नीट अभ्यास करावा. स्वतःमध्ये इतके मग्न होऊन चालणार नाही की पुढे घडणाऱया घटनांचा अंदाज येऊ नये.
सफेद हातरुमाल जवळ ठेवावा
मकर
या आठवडय़ात तुमच्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याकरता प्रयत्न करणे गरजेचे असेल. तशा संधीसुद्धा प्राप्त होण्याची शक्मयता आहे. फक्त माघार घेऊ नका. वादावादीपासून दूर राहा मग ती कामाच्या ठिकाणी असो, घरात किंवा कुटुंबात असो. आर्थिक बाजू मजबूत करणारे काही प्रोजेक्ट मिळणे शक्मय आहे. फक्त आळस सोडावा लागेल. प्रेमसंबंध मधुर होतील.
केळीच्या झाडाला पाणी घालून ओली माती कपाळी लावावी
कुंभ
धावपळीचा आणि भावनिक गुंतागुंतीचा आठवडा असणार आहे. कामांना जर योग्य पद्धतीने नियोजित केले तर पूर्ण होण्यास जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. जी आजूबाजूची माणसे आहेत त्यातील खरोखर जे तुमच्या बाजूने आहेत त्यांना ओळखणे गरजेचे असेल. आपले सिपेट्स आणि मनातले प्लॅन्स कोणाबरोबरही शेअर करताना सांभाळून करा. लोक फायदा उचलू शकतात. आर्थिक बाजू चांगली असेल.
वडाची मुळी जवळ ठेवावी
मीन
कष्टाचे फळ मिळण्याकरता वेळ जरी लागला तरी ते चांगल्या पद्धतीने आणि योग्य वेळी मिळेल याची खात्री बाळगावी. निदान कष्ट वाया जाणार नाहीत हे नक्की. काही लोकांकडून अनपेक्षितरित्या मदत मिळेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रगतीकरता आणि भल्याकरता काही सल्ला देतील तो अमलात आणावा. तुमच्यासमोर या आठवडय़ात द्विधा मनस्थिती असेल. त्यातून योग्य तो निर्णय घेतल्यास फायदा होईल.
केशरी टिळा लावावा.
टॅरो उपायः सरकारी कामांमध्ये विलंब होत असेल, एखादा सरकारी कर्मचारी तुमचे काम करत नसेल तर तांब्याच्या भांडय़ात गंगाजल घेऊन त्यात थोडे कुंकू घालावे. त्यात सात लाल मिरचीचे दाणे (बिया) घालावेत आणि या पाण्याने सूर्याला अर्ध्य द्यावे.