दि. 15-1-2023 ते 21.1.2023 पर्यंत
मेष
आजूबाजूच्या लोकांवर जितका विश्वास ठेवायला हवा तितकाच ठेवला तर फायद्यात असाल. येणाऱया आठवडय़ामध्ये काही लोक तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारपणामुळे त्रास होऊ शकतो. एका महत्त्वाच्या कामासाठी पैशांची गरज भासली तर ती अगम्य रीतीने पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी आपले काम आणि आपण असे धोरण ठेवले तर बरे होईल.
पिंपळाला काळा दोरा बांधावा.
वृषभ
अपेक्षापूर्तीचा आणि संधीचे सोने करण्याचा काळ आहे. या काळात आळस दूर सारून योग्य ते निर्णय तत्परतेने घेऊन कामे करावी. छोटय़ा मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागला तरी पुढे जाऊन यश नक्की मिळेल. विद्यार्थी वर्गाला कष्ट करण्याची गरज आहे. आठवडय़ाच्या शेवटी अचानक मदत मिळण्याची शक्मयता आहे. आर्थिक बाजू कमकुवत होऊ नये म्हणून खर्चाला आवर घालणे आवश्यक ठरेल.
शमीची 7 पाने पैशाच्या पाकिटात ठेवावीत
मिथुन
तुमचा स्वभाव मिस्कील जरी असला तरी कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. शाब्दिक वादावादीचे प्रसंग येऊ शकतात. एखाद्या आमंत्रणला मान देऊन प्रवास करावा लागू शकतो. जवळच्या व्यक्तीला मदत करण्यासाठी खर्च करावा लागेल. कामाच्या ठिकाणी दगदग वाढल्याने शारीरिक थकवा येऊ शकतो. आर्थिक बाबतीमध्ये पूर्वी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
वडाचे पान जवळ ठेवावे
कर्क
एखाद्या छोटय़ा समारंभामध्ये सामील व्हाल. या आठवडय़ात तुमचा नावलौकिक वाढण्याची शक्मयता आहे. तब्येतीच्या दृष्टीने थोडा कठीण काळ असला तरी निराश न होता योग्य तो उपचार घ्यावा. बरेच दिवस न झालेले एखादे काम पूर्ण होण्याची शक्मयता आहे. एखाद्या धार्मिक प्रवृत्तीच्या माणसाची मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी कामांच्या बाबतीत गोंधळ होऊ शकतो. मदत मागायला मागेपुढे पाहू नका.
भोक असलेले तांब्याचे नाणे जवळ ठेवा
सिंह
स्वभावाला औषध नाही हे लक्षात घेऊन लोकांना माफ करायला शिकावे लागेल. काही लोक विनाकारण डिवचतील. पण तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवून आपली कामे पूर्ण करायचा प्रयत्न करा. कुटुंबातील लहान-सहान भांडणांकडे दुर्लक्ष करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेली विनंती मंजूर होण्याची शक्मयता आहे. प्रेमींनी एकमेकांसाठी वेळ काढणे गरजेचे असेल.
ईशान्य कोपऱयात पाण्याने भरलेले भांडे ठेवा
कन्या
या आठवडय़ामध्ये काय चांगले आणि काय वाईट याचा निर्णय घेताना गोंधळ उडण्याची शक्यता आहे. दिसते तसे नसते याची प्रचिती या काळात येऊ शकते. कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत असताना डोळे आणि कान उघडे ठेवा. मित्रांकडून किंवा जवळच्या व्यक्तींकडूनच दगा फटक्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक बाबतीत तितकीशी काळजी करण्याची गरज नाही.
हाताने कातलेले सूत मनगटाला बांधावे
तूळ
देता किती घेशील दो कराने असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. मनातील इच्छा पूर्ण होतील. प्रिय व्यक्तीची गाठ भेट होईल. कामाच्या ठिकाणी कामे पूर्ण झाल्याने समाधान वाटेल. पण त्याच वेळी अंतर्गत राजकारणामुळे त्रास होऊ शकतो. आनंदाच्या भरात कोणालाही कसलेही वचन देऊ नका. काही वेळा ‘मी हे काम पूर्ण करू शकेन की नाही’ असे वाटण्याची शक्मयता आहे. कुटुंबात आनंद असेल.
वाहत्या पाण्यात पाच कवडय़ा प्रवाहित करा
वृश्चिक
‘हेची फळ काय मम तपाला’ म्हणजे पुष्कळ राबूनसुद्धा योग्य तो मोबदला न मिळाल्याने थोडी निराशा होऊ शकते. पण संयमाने घेतले तर विलंबाने का होईना पण यश नक्की मिळेल. हाताखालील लोकांची मर्जी सांभाळावी लागेल. ज्यांच्या हाताखाली काम करता, त्यांच्या रोषाला आमंत्रण देऊ नका. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. प्रेमींनी योग्य-अयोग्य याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
पिंपळाच्या फांदीला लाल दोरा बांधावा
धनु
आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या कामांची यादी करून योग्य ते नियोजन करून कामे पूर्ण करावी, नंतर तब्येतीच्या तक्रारीमुळे किंवा एखाद्या कौटुंबिक कारणास्तव अडचण येऊ शकते. या आठवडय़ात तुमची मनस्थिती मागच्या काही दिवसांपेक्षा बरी असेल. फारसा परिचय नसलेले लोकदेखील तुमच्याकडे मदत मागू शकतात आणि तुम्हीही त्यांना मदत कराल. अशावेळी फक्त त्यांचा हेतू शुद्ध आहे ना याची खात्री करून घ्यावी.
आंघोळीच्या पाण्यात चमचाभर दही घालावे
मकर
आर्थिकदृष्टीने आणि सामाजिक प्रति÷sच्या दृष्टीनेदेखील येणारा आठवडा महत्त्वपूर्ण असेल. पूर्वी ज्यांच्यावर उपकार केले होते अशा माणसांची योग्यवेळी साथ मिळण्याची शक्मयता आहे. कुटुंबामध्ये एखाद्या त्रयस्थ व्यक्तीमुळे वाद होण्याची शक्मयता आहे. भांडण विकोपाला जाऊ नये याची का काळजी घ्यावी. गुरुवारी एखाद्या मित्राची मदत मागावी लागू शकते. अशावेळी संकोच न करता मदत घ्यावी.
तुळशीखालील माती कपाळी लावा
कुंभ
या आठवडय़ात काही व्यक्ती तुमच्याकडे सल्ला मागायला येऊ शकतात. त्यांच्या पुढील योजनेकरता तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. आप्तस्वकियांना आर्थिक मदत करण्यापूर्वी स्वतःच्या कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष द्यावे. एखादा जुना सहकारी भेटून जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकेल. तुमच्या आजूबाजूच्या माणसांच्या मनात काय चालले आहे आहे त्याचा अंदाज घेणे अवघड होऊन बसेल.
5 फूलवाल्या लवंगा जवळ ठेवा
मीन
कामाचा ताण कमी झाल्यामुळे किंवा कामाच्या ठिकाणी कामांचे नियोजन तुमच्या मनाप्रमाणे झाल्या मुळे थोडे रिलॅक्स वाटू शकते. बऱयाच दिवसांनी जुन्या मित्राने आठवण काढल्याने खुश व्हाल. तुमचे हित चिंतणारे लोक जवळपास असल्याने धीर मिळेल. आर्थिक परिस्थिती लवकरच चांगली होणार असे संकेत आहेत. जवळची व्यक्ती प्रवासाला निघत असल्याने थोडी चिंता वाटू शकते. ऑफिसमधील राजकारणाला बळी पडू नका.
तीन पिवळय़ा कवडय़ा पाकिटात ठेवा
टॅरो उपाय ः अधिकारी वर्गाकडून (बॉसकडून) कायम अपमान होत असेल, तुमच्या वर काम करणारे तुम्हाला नीट वागवत नसतील (तुमची काही चूक नसताना) तर सोळा सब्जाच्या बिया पांढऱया कापडात बांधून (पुरचुंडी करून) ऑफिसमध्ये एखाद्या झाडाच्या कुंडीत मंगळवारी ठेवाव्या.