Tarun Bharat

राशींचा देश-टॅरोचा संदेश

दि. 10-7-2022 ते 16-7-2022

मेष

 घरातील सदस्य जर अनाठायी मागणी करत असतील किंवा तुमचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोचत नसेल तर त्यांना समजावून आपला मार्ग न सोडणे हे बरे. पैशांच्या बाबतीत सुदैवी असाल. घरातील एखादी वस्तू गहाळ होणे किंवा फुटणे, तुटणे यासारख्या घटना घडतील. मित्रमंडळींमध्ये आपला अपमान होऊ देऊ नका. तब्येतीला सांभाळावे लागेल.

आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालावे

वृषभ

 येणारा आठवडा आशादायक घटना घडवणार आहे. या संधींचा फायदा तुम्ही किती घेता हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या अनुभवावरून तुम्ही निर्णय घ्याल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींकरता अनुकूल काळ आहे. कामाच्या ठिकाणी दुसऱयावर अवलंबून राहू नका. तब्येत ठीकठाक असेल. पैशांची आवक उत्तम असेल.

औदुंबराला दूधमिश्रित पाणी घाला

मिथुन

पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद संभवतो. कुटुंबातील स्त्रीवर्गाचे वागणे खटकू शकते. तब्येतीला सांभाळावे लागेल. जुने दुखणे डोके वर काढू शकते. किमती वस्तूंना सांभाळून ठेवा. मित्रांवरती विश्वास ठेवणे महागात पडू शकते. आपल्या योजना केवळ आपल्यापर्यंत ठेवा. तुमच्या स्वभावाचा फायदा तुमचे सहयोगी उचलू शकतात. वरि÷ांचे अतिरिक्त काम करावे लागेल.

जलाशयातील पाच दगड पूजावेत

कर्क

तुम्ही ठरवलेल्या योजना आणि घडणाऱया घटना यांच्यात मेळ न बसल्याने मन थोडे उदास होऊ शकते. काही कामे रेंगाळतील. कामे पूर्ण होण्याकरता उशीर होईल पण धीर सोडू नका. सामान्य आजार त्रास देऊ शकतात. एखाद्या सरकारी कामाला पूर्ण करण्याकरता पुनः पुन्हा प्रयत्न करावा लागेल. कुटुंबातील सदस्य वेळ न दिल्याची तक्रार करतील.

पक्ष्यांना बाजरी घालावी.

सिंह

कामाचा अतिरिक्त दबाव आणि लोकांचे बोलणे याचा या आठवडय़ात त्रास होऊ शकतो. तब्येतसुद्धा म्हणावी तशी साथ देणार नाही. अशावेळी एक छोटासा ब्रेक कामी येईल. कामे वेळेत पूर्ण करण्याकरता योग्य नियोजन करणे आवश्यक ठरेल. यासाठी एखाद्या मित्राचा किंवा सहयोग्याचा सल्ला घेणे योग्य ठरेल. वडिलांच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते.

गरजूला छत्रीचे दान द्यावे.

कन्या

तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे तुमच्याबद्दलचे मत काय आहे त्याबद्दल लक्ष न दिलेले बरे. काही बाबतीत घरातील लोकांशी आणि संबंधित सहकर्मींशी वाद संभवतो. आपली बाजू योग्य असल्यास न झुकलेले बरे. संततीबद्दल काळजी वाटू शकते. पैशांची आवक सर्वसामान्य असेल. लोकांशी गोड बोलून कामे करून घ्यावीत. प्रेमींकरता सबुरीचा संदेश आहे.

आपले जुने वस्त्र एखाद्या गरजूला दान द्यावे.

तूळ

आपली ऐपत पाहूनच खर्च करणे योग्य ठरेल. अनाठायी केलेल्या खर्चामुळे नंतर अडचणीत येण्याची शक्मयता आहे. या आठवडय़ात कुठेही अनावश्यक वस्तू खरेदी करू नका. तब्येतीच्याबाबतीत हलगर्जीपणा करणे हे दुखण्याला आमंत्रण देण्यासारखे असेल. मित्रांच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका. काही बाबतीत कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी लागेल. आलेले पैसे गुंतवण्याचा विचार करा.

दूध दान द्यावे.

वृश्चिक

कामाच्या ठिकाणी एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. ओळखीतून कामे मिळतील. ती पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्यावे. घरातील वातावरण पोषक असेल. एकमेकाना मदत करण्यासाठी घरातील व्यक्ती पुढे येतील. पोटाच्या आणि हाडांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य उपचाराने व्याधी लवकर बऱया होतील. एखाद्या व्यक्तीशी झालेली भेट संस्मरणीय ठरेल. पैशांची आवक वाढेल.

उडीद दान द्यावे.

धनु

या आठवडय़ात कित्येक प्रसंग असे येतील की जिथे तुम्हाला वाटेल की व्यक्त व्हावे, आपल्या भावना बोलून दाखवाव्यात पण कुणासमोर बोलून दाखवाव्यात असा प्रश्न पडेल. भावनांचा कोंडमारा होऊ देऊ नका. कुटुंबातील सदस्य किंवा जिवलग मित्रांकडे व्यक्त होण्याची गरज आहे. पैशांच्याबाबतीत समाधान काहीसे कमी असेल पण मित्रांचा पाठिंबा मिळेल.

लोखंडी तवा दान द्यावा.

मकर

योजनांना यशस्वी करण्याकरता विशेष प्रयत्नांची गरज आहे. घरातील एखादा सदस्य चुकीचा निर्णय घेऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी आपण केलेले काम आणि पुढे घेणारे निर्णय यांच्याबाबतीत गुप्तता बाळगायची गरज आहे. पैशांची आवक असेल पण खर्चही तितकाच वाढेल. प्रेमींनी पार्टनरची अवास्तव मागणी मान्य करू नये. प्रति÷sला सांभाळावे लागेल.

चिमूटभर हळद पाण्यात घालून आंघोळ करा.

कुंभ

लोक तुमचा उपयोग करून घेत आहेत हे माहीत असूनसुद्धा तुम्हाला नाईलाजाने त्यांची कामे करावी लागतील. या आठवडय़ात थोडे नैराश्य येऊ शकते. ज्या पद्धतीने आणि गतीने कामे व्हायला हवीत तशी न झाल्याने तुम्ही उदास व्हाल. घरातील छोटय़ा-मोठय़ा भांडणाला शांत करण्याचे काम करावे लागेल. पैशांच्या बाबतीत समाधानी असाल. तब्येतीला जपावे लागेल. सर्दी-पडशाचा त्रास होऊ शकतो.

रविवारी नारळाच्या झाडाखालील माती घरी ठेवावी.

मीन

करायला गेलो एक आणि झाले भलतेच असा साधारण अनुभव येईल. तुमच्या बोलण्याचा वेगळा अर्थ लावला गेल्याने तुम्ही हतबल होण्याची शक्मयता आहे. याकरता कामाच्या ठिकाणी शक्मयतो कमीत कमी बोलावे. लोक राजकारण करून तुम्हाला बळीचा बकरा करू शकतात. मानसिक शांतीला प्राधान्य द्यावे. पायाची दुखणे त्रास देऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱया वाढतील. फिरोजा रत्न जवळ ठेवावे.

टॅरो उपाय ः

जमीन किंवा घर विकले जात नसेल तर बुधवारी बुधाच्या होर्या मध्ये त तेथील माती किंवा धूळ वेलचीच्या पावडरसोबत  पिवळय़ा कपडय़ामध्ये बांधावी आणि विकली जावी अशी प्रार्थना करून त्या जमिनीत किंवा घरात गुप्त जागी ठेवावी. विकली गेल्यानंतर प्रवाहित करावी.

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 1 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.21 एप्रिल 2022

Patil_p

आजचे भविष्य 17-12-2021

Amit Kulkarni

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि. 14 मे 2020

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 25 मार्च 2023

Patil_p