दि. 5-6-2022 ते 11-6-2022 पर्यंत
मेष
या आठवडय़ामध्ये एखादी अनामिक भीती सतावू शकते. स्वतःबद्दल किंवा घरातल्या सदस्यांबद्दल चिंता वाटू शकते. पण टॅरोचा संदेश आहे की ही भीती अनाठाई असेल. कामे वेळेवर पूर्ण करण्याकडे तुमचा कल असेल. कामाच्या ठिकाणी काही कामे करताना मन लागणार नाही. पैशांच्या बाबतीत चिंता वाटू शकते. प्रेमींनी मर्यादांचे भान ठेवावे.
लाल रंगाचा दोरा मनगटाला बांधावा.
वृषभ
ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे अशी साधारण तुमची मनःस्थिती असेल. लोकांनी दिलेला कुठला सल्ला ऐकावा आणि कुठला सोडावा याची योग्य जाणीव तुम्हाला होईल. कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना राबवाल आणि त्याचे कौतुक होऊ शकते. कोणत्याही दडपणाखाली न येता निर्णय घ्यावा असा टॅरोचा संदेश आहे. या आठवडय़ात वेळ पाळणे तुम्हाला जमणार नाही.
धार्मिक पुस्तकाचे दान द्यावे.
मिथुन
पैशांच्याबाबतीत हा आठवडा चांगला असेल. एखादी नवीन आर्थिक योजना आखाल. स्थावर इस्टेटीच्याबाबतीत जर एखादा प्रश्न असेल तर तो सुटेल. अचानक धनलाभाच्यादृष्टीनेही हा आठवडा उत्तम आहे. नोकरी बदलण्याच्या बाबतीत जर विचार करत असाल तर सध्या योग्य वेळ नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये गैरमार्गाने पैसा कमवण्याचा विचार करू नका.
फळांचे दान द्यावे.
कर्क
व्यक्ती तितक्मया प्रकृती हे कायम ध्यानात ठेवा. एखाद्या व्यक्तीने तुमच्या मताप्रमाणे वागले पाहिजे असा हट्ट धरून चालणार नाही. त्याने नात्यांमध्ये कटूपणा येऊ शकतो. कामे पूर्ण करताना नियमबद्ध पद्धतीने काम करा. अति चोखंदळपणामुळे नुकसान होऊ शकते. पैशांच्याबाबतीत आठवडा सर्वसाधारण असेल. वैवाहिक जीवनामध्ये तडजोड करावी लागू शकते. प्रेमींनी सावध राहावे.
पांढऱया रंगाचे वस्त्र दान करावे.
सिंह
या आठवडय़ामध्ये मदतीचा अनमोल उपहार तुम्हाला मिळेल. ज्यांच्याकडून अपेक्षा नाही अशी माणसेही मदतीचा हात पुढे करू शकतात. पण योग्य माणसाकडूनच मदत स्वीकारणे शहाणपणाचे ठरेल. ज्ये÷ व्यक्तीचा सल्ला कामी येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादांना टाळणे गरजेचे आहे. वैवाहिक जोडीदाराकडून उपहारप्राप्ती संभवते. प्रेमी सहवासाचा आनंद घेतील. गूळ दान करा.
कन्या
लोक तुमच्या स्वभावाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील. तडजोड करताना आपण काय गमावतोय याकडे लक्ष असणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणीसुद्धा काही व्यवहारात तुम्हाला नमते घ्यावे लागेल. काही न पटणाऱया गोष्टी कराव्या लागतील. भविष्याच्या दृष्टीने धनसंचय करणे आवश्यक ठरेल. नात्यांच्याबाबतीत उदार धोरण ठेवणे योग्य ठरेल. वैवाहिक जीवनात उतार चढाव संभवतात.
लहान मुलांना शैक्षणिक साहित्य भेट द्यावे.
तूळ
अति विचार करण्यामुळे थकवा येऊ शकतो. अति काळजी करण्याने तब्येत बिघडू शकते. या आठवडय़ात खर्चावर आळा घालणे अत्यावश्यक ठरेल. आर्थिक नियोजन ढासळण्याची शक्मयता आहे. तुमच्या सल्ल्यामुळे लोकांचा फायदा होईल. या आठवडय़ात एकटेपणा जाणवू शकतो. काही लोक दिलेला शब्द पाळणार नाहीत. त्यामुळे मनःस्ताप होऊ शकतो. वैवाहिक जोडीदाराची मदत घ्यावी.
पांढरा हात रुमाल जवळ ठेवावा.
वृश्चिक
तुम्ही केलेल्या कष्टांचा योग्य परतावा मिळण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न करणे गरजेचे ठरेल. कौटुंबिक समारंभात भाग घेऊ शकता. एखाद्या जुन्या मित्राची किंवा बरीच वर्षे न भेटलेल्या नातेवाईकांची भेट होऊ शकते. आर्थिक बाबतेत समाधानी असाल. तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या आठवडय़ात एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. वैवाहिक आयुष्यात समाधान असेल.
वस्त्र दान कराव
धनु
तुमचा राग दुसऱया एखाद्या व्यक्तीवर काढणे चुकीचे ठरेल. यामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. कामे वेळेवर पूर्ण करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो. लांब राहणाऱया नातेवाईकांशी बोलणे झाल्याने मन प्रसन्न असेल. कौटुंबिक संबंध घट्ट होतील. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
खिरीचे दान द्याव
मकर
हा आठवडा धावपळीचा असेल. कामांचा उरक वाढवावा लागेल. जबाबदाऱयांचे ओझे वाढू शकते. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल. या सगळय़ामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव तुमच्या मनावर येऊ नये यासाठी प्रयत्न करा. शरीराच्या उजव्या बाजूला छोटी मोठी दुखापत संभवते. कष्टांच्या तुलनेत आर्थिक आवक कमी असेल. गंगाजलाने स्नान करावे
कुंभ
तुमच्या इच्छेप्रमाणेच सगळय़ा गोष्टी घडतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे असा टॅरोचा संदेश आहे. आर्थिकबाबतीत तडजोड स्वीकारावी लागेल. नात्यातली एखादी व्यक्ती त्रास देऊ शकते. आर्थिक व्यवहार करत असताना अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील ज्ये÷ स्त्रीचा सल्ला कामी येईल. वडिलांच्या तब्येतीबद्दल चिंता वाटू शकते. वैवाहिक जीवनात कलह येऊ नये याची काळजी घ्यावी. पक्ष्यांना बाजरीचे दाणे घालावे
मीन
आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. तब्येतीच्या छोटय़ामोठय़ा तक्रारी त्रास देऊ शकतात. पायाचे दुखणे वाढू शकते. भविष्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. कागदोपत्री व्यवहारात चोख रहा. कामांचे कौतुक होईल. तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये तुमच्याविषयी असूया निर्माण होऊ शकते. सावध राहणे गरजेचे आहे. परिवारातील सदस्यांचे मन सांभाळण्यात वेळ वाया जाईल.
बेलाचे पान जवळ ठेवावे.
टॅरो उपाय-
बऱयाच वेळेला नात्यांमध्ये दुरावा येतो. एकत्र राहूनसुद्धा मने जुळत नाहीत. अशावेळी नवीन काचेची बरणी घ्यावी, त्यात साखर भरावी. ज्या व्यक्तीशी नाते सुधारायचे आहे त्या व्यक्तीचा फोटो घ्यावा. त्यामागे आपली इच्छा हिरव्या शाईने लिहावी. तो फोटो त्या साखरेत घालावा. बरणी मेणाने सील बंद करावी आणि पांढऱया कपडय़ात बांधून गुप्त जागी ठेवून द्यावी.