बार्बी डॉलच्या थीमवर गुलाबी घर
एरियाना आणि तिचा पती एरिकने बोरिंग मोटरहोम खरेदी करत तिला बार्बी डॉलच्या गुलाबी रंगातील घरात रुपांतरित केले आहे. पती-पत्नी आता याच घरात राहतात आणि त्यांच्याकडे यासंबंधी मोठमोठे फ्यूचर प्लॅन्स आहेत. 4 आठवडय़ांमध्ये त्यांनी स्वतःची नुतनीकरणाची योजना पूर्ण केली आणि आता ते या स्वप्नातील घरात सवार होत आनंदाने स्वतःच्या पसंतीच्या ठिकाणांची सैर करतात.
33 वर्षीय एरियाना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाची रहिवासी आहे. तिने स्वतःचे 56 वर्षीय पती एरिकसोबत मिळून ऑगस्ट 2020 मध्ये एक बसवर तयार केलेल्या मोटरहोमला बार्बी थीमच्या सुंदर घरात रुपांतरित केले. या पूर्ण नुतनीकरणात त्यांना दीड लाख रुपयांचा खर्च आला. बॅले डान्सर असलेली एरियाना आणि डिझायनर पती एरिकने अमेरिकेत फिरत स्वतःचा बहुतांश वेळ घालविला आहे.
लहानपणापासूनच एरियानाला बार्बी अत्यंत आवडायची. 12 वर्षांचे वय असेपर्यंत एरियाना बार्बी डॉलससोबत खेळत होती आणि मोठी झाल्यावरही बार्बी डॉलबद्दलचे तिचे प्रेम वाढतच गेले. किशोरवयानंतरही तिचे बार्बी डॉलवरील प्रेम कायम राहिले.
आमचे मोटरहोम एकदम बार्बीच्या घराप्रमाणेच वाटते एकदा एका छोटय़ा मुलीने आमच्या कँपरव्हॅनचा दरवाजा ठोठावला आणि ही बार्बी कँपरव्हॅन आहे का असे विचारले. यानंतर आम्ही या मुलीला व्हॅन पाहण्यासाठी आत बोलाविल्याचे एरियानाने सांगितले आहे.
घरात बार्बी थीमचा सोफा, कुशन आणि पडदे लावण्यात आले आहेत. तिची आरव्ही लाइफस्टाइलची व्हॅन लोकांना स्वतःच्या दिशेने आकर्षित करते. तिला अनेकदा पार्किंगदम्यान मात्र अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. कॅलिफोर्नियापासून फ्लोरिडापर्यंतचा प्रवास या जोडप्याने 3 वेळा केला आहे. ते स्वतःची म्युझिकल परफॉर्मन्स आणि टूरसाठी व्हॅनद्वारे प्रवास करतात. त्यांना स्वतःचे राहणीमान अत्यंत ग्लॅमरस वाटते आणि महिन्यात 30 हजार रुपयांचा गॅस रीफिल त्यांना पुरेसा ठरतो.