Tarun Bharat

सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन तरच ऍट्रॉसिटीचा गुन्हा

कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश

प्रतिनिधी /बेंगळूर

Advertisements

जातीयवादी गैरवर्तन सार्वजनिक ठिकाणी किंवा स्थळी झाले तरच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम लागू होत असल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे.  याचबरोबर उच्च न्यायालयाने एक प्रलंबित प्रकरण निकालात काढले आहे. तळघरात आपल्यासोबत जातीयवादी गैरवर्तन झाले होते, यावेळी माझे सहकारी देखील उपस्थित होते अशी तक्रार एका व्यक्तीने केले होते. परंतु न्यायालयाने तळघर हे सार्वजनिक ठिकाण असू शकत नसल्याचे नमूद केले आहे.

इमारतीचे तळघर सार्वजनिक ठिकाण नव्हते. तसेच केवळ तक्रारदार आणि त्याचे सहकारी हा प्रकार घडल्याचा दावा करत आहेत. तक्रारदाराचा आरोपीसोबत बांधकामावरून वाद होता. त्याने घरबांधणीच्या विरोधात स्थगिती मिळविली होती असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

2020 मध्ये कथितरित्या इमारतीच्या बांधकामादरम्यान आरोपीने तळघरात जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे होते. या घटनेवेळी कथितरित्या पीडित आणि त्याचे सहकारी उपस्थित होते असाही दावा होता.

कथित अपशब्दांचा वापर स्पष्टपणे सार्वजनिक ठिकाणी करण्यात आलेला नाही. याचमुळे यात शिक्षेची तरतूद नाही. याचबरोबर अन्य काही कारणांमुळे तक्रारदाराबद्दल संशय निर्माण होतो. आरोपीचा तक्रारदारासोबत वाद सुरू होता. त्याने घरबांधणीच्या विरोधात स्थगिती मिळविली होती. याचमुळे तक्रारदार स्वतःच्या सहकाऱयांच्या मदतीने आरोपीला लक्ष्य करत असावा अशी दाट शक्यता आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

तक्रारदाराने आरोपीवर ईजा केल्याच्या आरोपांतर्गत कलम 323 अंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. परंतु तक्रारदाराच्या शरीरावरील जखमेच्या खुणा या किरकोळ खरचटल्याचे दाखविणाऱया आहेत. यात रक्तस्रावाचा संकेत मिळत नाही. याचमुळे किरकोळ खरचटल्याप्रकरणी भादंविचे कलम 323 अंतर्गत गुन्हा ठरू शकत नसल्याचे उद्गार न्यायालयाने काढले आहेत. उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर गुन्हा घडल्याचेच सिद्ध होत नाही, अशा स्थितीत याचिकाकर्त्यावर गुन्हेगारी खटला चालविणे पूर्णपणे अयोग्य असेल, यामुळे कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग होईल असे न्यायालयाने नमूद पेले आहे.

Related Stories

‘बेंगळूर टेक समिट’चे आयोजन नोव्हेंबरमध्ये

Amit Kulkarni

बेंगळूरमध्ये कोरोनाचे ६२ हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण

Abhijeet Shinde

कर्नाटकातील विविध जिल्ह्यांसाठी आयएमडीकडून रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

Abhijeet Shinde

बीबीएमपी व आरोग्य विभाग लसीकरणासाठी जनजागृती करणार

Abhijeet Shinde

व्यावसायिक कोर्ससाठी इच्छुकांना ‘गेट सेट गो’

Amit Kulkarni

कर्नाटक : योगी सरकारच्या राज्यात महिला असुरक्षित : सिद्धरामय्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!