Tarun Bharat

Solapur : पंढरपूरात आढळला नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह

पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर शहरातील संतपेठ भागातील बंद असलेल्या महिला सार्वजनिक शौचालयामध्ये नऊ वर्षीय बालकाचा मृतदेह सोमवारी पहाटे आढळून आला आहे. बालकाच्या गळ्यापासून ते बेंबीपर्यंतचा भाग गायब होता. कृष्णा तिमा धोत्रे (वय 9 वर्षे) रा.जगदंबा वसाहत,संतपेठ,पंढरपूर असे मयत बालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तिमा पांडुरंग धोत्रे हे जगदंबा वसाहत, संतपेठ, पंढरपूर याठिकाणी राहतात. रविवारी रात्री आठ वाजता तिमा धोत्रे यांचा मुलगा कृष्णा हा नातेवाईकांच्या घरातून जेवण करून बाहेर गेला होता. कृष्णा बराच वेळ बाहेरच होता. उशिरापर्यंत रात्री कृष्णा स्वतःच्या व नातेवाईकांच्या घरी परत आला नाही. कृष्णास येण्यास रात्री उशीर झाल्याने रात्री शोधा शोध सुरू झाली परंतु सोमवारी पहाटे कृष्णाचा मृतदेह संत पेठ येथील बंद असलेल्या सार्वजनिक महिला शौचालयात आढळून आला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून घटना कशामुळे घडली याचा पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

सावित्रीबाई फुले जयंती दिनी युवा चित्रकार विपुल मिरजकर यांनी साकारली भव्य दिव्य रांगोळी

Archana Banage

प्रस्ताव पंढरपूरचा…. विभाजन तीन जिल्ह्यांचे

Archana Banage

माढा तालुक्याच्या चिंतेत भर, ८ रुग्णांची वाढ

Archana Banage

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोट्यावधी युवक बेकार

Archana Banage

रमाबाईंमुळेच बाबासाहेब घडले : कौतिकराव ठाले-पाटील

prashant_c

पाकिस्तानमध्ये सापडलेला लऊळचा मनोरुग्ण अखेर स्वगृही परतला

Archana Banage