Tarun Bharat

छ. संभाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा येत्या २८ रोजी

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील संभाजी महाराजांच्या स्मारकाचे शुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले असून येत्या २८ जानेवारी रोजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनाखाली स्मारकाचे शुशोभीकरण करण्यात आले आहे.

शनिवार दि २८ रोजी सकाळी ५ ते दुपारी १ पर्यंत राज्याभिषेक व होमहवन करण्यात येणार असून सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत सुशोभीत करण्यात आलेल्या चौकाचे आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून ग्वाल्हेर राजघराण्याचे वंशज व भारताचे सेंट्रल इन्फॉमेशन कमिशनर उदय माहूरकर उपस्थित राहणार आहेत. ते जेष्ठ इतिहासकार असून शिवाजी महाराजांच्यावर त्यांचा मोठा अभ्यास आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांवर त्यांचा पुस्तक लिहिण्याचा मानस आहे.

गेली दीड वर्षे स्मारकाच्या शुशोभीकरणाचे काम सुरु होते. लोकांकडून कोणतीही देणगी न घेता ४० लाख खर्चातून हे काम सुरु असल्याची माहिती बेनके यांनी तरुण भारत शी बोलताना दिली.

बेळगावच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या छ. संभाजी महाराज स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात संपूर्ण बेळगावकरांनी व तरुणांनी ढोल पथकासह सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार अनिल बेनके यांनी केले आहे.

Related Stories

हिंदवाडी येथील रस्ता वाहतुकीस धोकादायक

Amit Kulkarni

जिल्हय़ातील साडेचार लाख जणांचा अहवाल निगेटिव्ह

Amit Kulkarni

कांदा-बटाटा दर पुन्हा वधारला

Amit Kulkarni

फार्महाऊसवर झोपलेल्या वॉचमनचा खून

Omkar B

जीएसएस कॉलेजमध्ये ‘ओरिएंटेशन’ कार्यक्रम

Amit Kulkarni

फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याचा आजाराने मृत्यू

Patil_p