Tarun Bharat

सासष्टीतही उघड लँडमाफियांचे कारनामे

सासष्टीच्या अनेक गावांतून 17 जणांवर गुन्हा नोंद : तत्कालीन मामलेदारनी वर्षभरापूर्वी केली होती तक्रार : फातोर्डा पोलिसांकडून प्रकरण आता एसआयटीकडे

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

मूळ जमीन मालकांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी बळकावण्याचे प्रकार केवळ उत्तर गोव्यातच नव्हे तर संपूर्ण गोव्यातच घडले आहेत. सासष्टीतही असे प्रकार घडले असून या प्रकरणी एक वर्षापूर्वी फातोर्डा पोलीस स्थानकात 17 तक्रारी नोंद करण्यात आल्या होत्या, पण गेल्या वर्षभरात या प्रकरणाचा तपास पुढे जाऊ शकला नव्हता. आता जमीन बळकाव प्रकरण एसआयटीकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

खऱया जमीन मालकांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रे तयार करून त्या जमिनींचे म्युटेशन करून त्या परस्पर विकण्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. सासष्टीत या प्रकरणी 17 जणांवर फातोर्डा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास पुढे जात नव्हता.

सासष्टी मामलेदाराकडून तक्रार

कुडतरी, राय, दवर्ली, धर्मापूर, सां जुझे द आरियाल, कुंकळळी उतोर्डा व गिर्दोळी येथील जमिनी बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून विकल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात मूळ मालकांनी तक्रारी केल्यानंतर सासष्टीचे तत्कालीन मामलेदार प्रताप गावकर यांनी या प्रकरणी फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली होती.

अनेक अधिकाऱयांचाही सहभाग

या प्रकरणी जरी 17 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी त्यापैकी दोन संशयितांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून अन्य तीन संशयितांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी तपासात या घोटाळय़ात काही सरकारी अधिकारीही गुंतले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सरकारी अधिकारी गुंतल्याने या प्रकरणाचा तपास गेले वर्षभर पुढे गेला नसावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात केवळ एकाच संशयिताची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून अन्य संशयितांनी त्याना पोलीस स्थानकात हजर राहण्याच्या नोटीसा जारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले असून त्यांच्यावर पोलिसांनीही काहीच कारवाई केलेली नाही.

फातोर्डा स्थानकात नोंद झालेले प्रकरण आत्ता एसआयटीकडे दिले जाणार असल्याची माहिती फातोर्डा पोलीस स्थानकाचे निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी दिली आहे.

Related Stories

‘गंगानाथ सिटी मार्केट’चे फोंडय़ात उद्घाटन

Amit Kulkarni

जलप्रलयामुळे दोन हजार कोटींचे नुकसान

Amit Kulkarni

डिचोली तालुक्मयात नवीन 4 कोरोना रूग्ण

Patil_p

काणकोणचे कदंब बसस्थानक जलमय

Omkar B

आजपासून मोफत पाणी

Amit Kulkarni

पर्यटकांना लूटप्रकरणी तिघा महिलांना अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!