Tarun Bharat

पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाचे डिझाईन तयार

Advertisements

भारतीय वायुदलाकरता मोठी योजना ः 2 वर्षांमध्ये निर्मिती शक्य

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय वायुदलासाठी पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या डिझाईनला अंतिम रूप देण्यात आले आहे. या विमानाला ‘ऍडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एएमसीए) नाव मिळाले आहे. देशात सध्या फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेली 4.5 व्या पिढीची राफेल लढाऊ विमाने आहेत. केवळ दोन वर्षांमध्ये पाचव्या पिढीचे विमान विकसित होण्याची शक्यता आहे. हे विमान अत्यंत घातक आणि अत्याधुनिक असणार आहे.

अमेरिकेचे सर्वात घातक लढाऊ विमान एफ-35 ला हे विमान वेगाच्याबाबतीत मागे टाकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एएमसीएचा कमाल वेग 2633 किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे. तर अमेरिकन लढाऊ विमानाचा कमाल वेग 2000 किलोमीटर प्रतितास आहे. एएमसीएची उड्डाणकक्षाही अमेरिकन एफ-35 पेक्षा अधिक असेल. भारतीय लढाऊ विमानाचा उड्डाणाचा पल्ला 3,240 किलोमीटर असणार आहे. तर अमेरिकन लढाऊन विमानाची उड्डाण कक्षा 2,800 किलोमीटर असेल.

भारतीय लढाऊ विमान 57.9 फूट लांब असणार असून एफ-35 याहून कमी आकाराचे म्हणजेच 51.4 फूट लांबीचे आहे. एएमसीएच्या पंखांचा आकार 36.6 फुटांचा तर एफ-35 मधील हा आकार 35 फुटांचा आहे. एएमसीएची उंची 14.9 फूट तर एफ-35 ची 14.4 फूट इतकी आहे.

एएमसीए केवळ एका प्रकरणी एफ-35 पेक्षा पिछाडीवर आहे. भारतीय विमानात 6500 किलोग्रॅम इंधनाची क्षमता असेल. तर अमेरिकेच्या लढाऊ विमानात 8,275 किलोग्रॅम इंधनाची क्षमता आहे. शस्त्रांप्रकरणी एएमसीएमध्ये 14 हार्डपॉइंट्स असतील. यात 23 किंवा 30 मिलिमीटरचे एक कॅनन जोडलेली असणार आह. याचबरोबर 58 रॉकेट पॉड्स, अस्त्र मार्क-1, 2, 3 हवेतून हवेत मारा करणारे एनजी-सीसीएम क्षेपणास्त्र, ब्राह्मोस एनजी, हवेतून जमिनीवर मारा करणारे रुद्रम क्षेपणास्त्र या विमानाला जोडण्यात येणार आहे.

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजेन्सीने (एडीए) एएमसीएचे डिझाइन तयार केले आहे. याचमुळे याच संस्थेला पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाची जबाबदारी देण्यात आली आहे. एडीएसोबत एअरक्राफ्ट रिसर्च अँड डिझाइन सेंटरने (एआरडीसी) देखील काम केले आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड या डिझाईनच्या आधारावर लढाऊ विमानाची निर्मिती करणार आहे.

Related Stories

लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित

datta jadhav

भारतीय रेल्वेकडून चिनी कंपनीचे 471 कोटींचे कंत्राट रद्द

datta jadhav

ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत मुलासह मुकुल रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Abhijeet Shinde

भारतात मागील 24 तासात 22,771 नवे कोरोना रुग्ण, 442 मृत्यू

datta jadhav

बँक मॅनेजरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याला कंठस्नान

datta jadhav

सत्तेवर आल्यावर परिवारवादी जमवितात अमाप संपत्ती

Patil_p
error: Content is protected !!