Tarun Bharat

कोल्हापुरातील धरणे आंदोलन यशस्वी करणार

युवा समितीचा निर्धार

बेळगाव

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे होणाऱ्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सीमावासीय उपस्थित राहून मराठी अस्मिता दाखवून देतील, असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शनिवारी आयोजित बैठकीत करण्यात आला.

     महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमावासियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ‘चलो कोल्हापूर’ची हाक दिली. सोमवार दि. 26 रोजी  कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन होणार आहे. या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. तसेच युवा समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन युवा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्ष-सदस्यांना वाढीव मानधन

Patil_p

बेळगावातून महाराष्ट्रात दररोज धावताहेत 49 बसेस

Patil_p

शहरातील मालवाहू वाहने जाग्यावरच!

Patil_p

रेल्वे स्थानकाचा चेहरा आता बदलणार

mithun mane

गोवावेस येथील कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू

Amit Kulkarni

राणी चन्नम्मा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ 5 रोजी

Patil_p