Tarun Bharat

कुंकळ्ळी बंडाच्या इतिहासाचे विकृतीकरण त्वरित थांबवावे

Advertisements

पणजीतील प्रदर्शन त्वरित बंद करा चिफटेन्स मेमोरियल ट्रस्टची मागणी

प्रतिनिधी /मडगाव

‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून स्वातंत्र्य लढय़ासह इतर इतिहासाची माहिती देणारे प्रदर्शन पणजीत भरवले आहे. या प्रदर्शनात कुंकळळीच्या इतिहासाची माहिती देणारी काही छायाचित्रे लावली आहेत. या छायाचित्राला कुंकळळीच्या चिफटेन्स मेमोरियल ट्रस्टने आक्षेप घेत हे प्रदर्शन त्वरित बंद करावे अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.

चिफटेन्स मेमोरियल ट्रस्टने याबाबत कदंब परिवहन महामंडळ, व्यवस्थापकीय संचालकांना याबाबत पत्र लिहले असून हे प्रदर्शन तातडीने बंद करावे, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. कुंकळळीच्या इतिहासाबद्दल काही लिहितांना शंभरवेळा विचार करावा असा इशारा पत्रकार परिषदेतून दिला आहे. कुणी तरी मुद्दामहून हा प्रकार केला असून त्याची सखोल चौकशी करावी व कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकाराने कुंकळळी ग्रामस्त संतप्त झाले आहेत.

ट्रस्टने याबाबत म्हटले आहे की, कुंकळीच्या इतिहासाचे सहेतू विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी इतिहासाचा दाखला देत कुंकळी बंडाचा उल्लेख प्रदर्शनात असे म्हटले आहे की ‘पुढारी, हिंदू ब्राह्मण जमीनदारांच्या फाशीनंतर कुंकळळी आणि वेळ्ळी, असोळणे, आंबेली आणि वेरोडा या गावातील शेतातून आणि फळबागांमधून निर्माण होणाऱया उत्पादनावर कर भरण्यास तत्कालीन पोर्तुगीज सरकारला नकार दिला. परिणामी त्यांच्या जमिनी जप्त केल्या गेल्या आणि मार्क्वसि ऑफ प्रंटियरच्या कॉन्डाडोकडे सोपविण्यात आल्या.

क्षत्रिय देसाई सरदारांच्या हत्याकांडानंतर देसाई यांना असोळणा किल्ल्यावर शांततेसाठी आमंत्रित केल्यानंतर वरील गावांतील समुदायाने पोर्तुगीजांना कर भरण्यास नकार दिला. त्यामुळे कुंकळळी क्षत्रिय देसाई समाजाच्या जमिनी सरकारकडून जप्त करण्यात आल्या.

पुंकळळी येथे जमिनी जप्त केल्यानंतर, गोवेकरांनी एक लढा दिला. यानंतर जप्त केलेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी दीर्घकालीन कायदेशीर लढा दिला. हा लढा केवळ गोव्यातील न्यायालयातच लढला गेला. जप्त केलेल्या जमिनी परत बहाल केल्या गेल्या. त्यामुळे हे प्रदर्शन तातडीने थांबवावे असेही या पत्रात म्हटले आहे.

कुंकळळीच्या इतिहासावर लिखाण करताना चिफटेन्स मेमोरियल ट्रस्टला विश्वासात घ्यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष ऑक्सर मार्टिन्स तसेच श्रीपाद देसाई उपस्थित होते.

Related Stories

‘हर घर जल’ ची पोलखोल

Amit Kulkarni

राणेंच्या मंत्रीपदाचा निवाडा 21 जूनला

Amit Kulkarni

साळगाव भाजपात बंड, स्वतंत्र उमेवार

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांवर जोरदार शाब्दिक प्रहार

Patil_p

उचगाव नेम्मदी केंद्रामधील भ्रष्टाचारामुळे गोरगरिबांची पिळवणूक

Patil_p

मधुमक्षिका पालन व्यवसायाचा सत्तरीत विस्तार करणार

Patil_p
error: Content is protected !!