Tarun Bharat

केदारनाथ धामचे दरवाजे हिवाळय़ासाठी बंद

देहराडून

 केदारनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळा हंगामामुळे शुक्रवारपासून बंद करण्यात आले. लष्कराच्या मराठा रेजिमेंटच्या पथकाने वाजवलेल्या धून-वाद्यांच्या निनादात दरवाजे बंद करताना सुमारे तीन हजार भाविक उपस्थित होते. आता 29 ऑक्टोबर रोजी डोली आपल्या हिवाळी पूजा आसन, ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ येथे विसावणार आहे. दुसरीकडे, दुपारी 12 वाजता यमुनोत्री धाममधील मां यमुना मंदिराचे दरवाजे बंद करून मातेची डोली तिच्या माहेरच्या खरसाळीकडे रवाना होईल. बुधवारी केदारनाथमध्ये बाबा केदार यांची पंचमुखी भोगमूर्ती फिरत्या उत्सव विग्रह डोलीत ठेवण्यात आली होती. गुरुवारी पहाटे 4 वाजल्यापासून केदारनाथ मंदिरात मुख्य पुजारी टी गंगाधर लिंग यांच्या हस्ते विशेष पूजेला सुरुवात झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून मंदिरात विविध धार्मिक विधी सुरू होते.

Related Stories

शोपियां चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

खासदार साध्वी प्रज्ञा यांना जीवे मारण्याची धमकी

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना फटकार

Patil_p

आनंदवार्ता : कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना तातडीच्या वापरासाठी मिळाली परवानगी

Archana Banage

अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून आतापर्यंत रोख 49 कोटी जप्त

Amit Kulkarni

व्हॉट्सऍप विरोधातील याचिकेवर केंद्राला नोटीस

Patil_p