हृदयाचे ठोके ऐकतो
माणसांसोबतच आता कपडे देखील आमच्या गोष्टी ऐकू शकतात. याचबरोबर शांतता आहे का गोंगाट? याची माहिती या कपडय़ांद्वारे मिळणार आहे. अमेरिकेच्या मेसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) वैज्ञानिकांनी एक स्मार्ट वस्त्र तयार केले असून ते आवाज ओळखू शकते. वैज्ञानिकांकडून डिझाइन करण्यात आलेला फॅब्रिक माइक आणि स्पीकरप्रमाणे काम करतो. माणसांचा आवाज, चिमण्यांची चिवविच आणि पानांच्या सळसळण्याचा आवाजही हे वस्त्र सहजपणे ओळखते.
यासंबंधीचे संशोधन नेचर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या फायबर्सला एका वस्त्रात विणले गेले असून ते आवाज ऐकू शकते. हे एका विशेष सामग्रीद्वारे तयार करण्यात आले असून याद्वारे इलेक्ट्रिकल सिग्नल रिलिज होतो. कुठल्याही व्यक्तीच्या हृदयाचे ठोके कशाप्रकारे होत आहेत, हे देखील याद्वारे समजते.
ट्वारन नावाची सामग्री आणि कॉटनद्वारे हे कापड तयार करण्यात आले आहे. या धाग्यांचे संयोजन साउंड एनर्जीला व्हायब्रेशनमध्ये परावर्तित करते. पीजोइलेक्ट्रिक मटेरियलद्वारे तयार विशेष फायबरचा या वस्त्रात वापर करण्यात आला आहे. हे मटेरियल दाबल्यास आणि किंवा दुमडल्यास व्होल्टेज निर्माण होते, ज्यानंतर या सिग्नल्सला एका डिव्हाइसच्या माध्यमातून रेकॉर्ड करून त्यांचे वाचन केले जाते.
हे फॅब्रिक माइकप्रमाणे काम करते आणि अनेक रेंज आणि लेव्हलचा आवाज ते पकडू शकते. या विशेष फॅब्रिकने तयार शर्ट परिधान केल्यास संबंधिताची त्वचा त्याच्या संपर्कात राहते, याद्वारे हार्टबीटचे निरीक्षण केले जाऊ शकते. या विशेष वस्त्राद्वारे हृदयविकारासह अनेक रोगांचे लवकर निदान करता येऊ शकते.