Tarun Bharat

देशाचा आर्थिक विकासदर 6 टक्क्यांवर राहणार

आर्थिक वर्ष 2024 साठी क्रिसिलचा अंदाज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

क्रिसिलच्या माहितीनुसार भारताचा आर्थिक वर्ष 2024 साठी सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर हा सहा टक्क्यांपर्यंत घसरणार असल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रीय सांख्यिकी संस्थेने(एनएसओ) आर्थिक वर्ष 2023 साठी हा वाढीचा दर 7 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे.

क्रिसिलने आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर हा सहा टक्क्यांपर्यंत घसरणार असल्याचे संकेत दिले आहेत. यासोबतच एनएसओने आर्थिक वर्ष 2023 साठी सात टक्क्यांचा अंदाज मांडला आहे. क्रिसिलने आरबीआयचा जीडीपी वाढीचा दर हा 6.4 टक्क्यांपेक्षा कमी राहणार असल्याचे भाकीत केले आहे. जीडीपीचा खरा विकासदर  हा महागाई वगळून मोजला जातो.

 क्रिसिलने सांगितले की, भारताच्या कमी आर्थिक विकास दराची तीन कारणे आहेत. प्रथम, जागतिक अर्थव्यवस्थेमधील मंदी, दुसरे वाढती महागाई आणि प्रमुख केंद्रीय बँकांचे वाढते व्याजदर ही तीन प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे भारताच्या विकासाला धोका निर्माण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पुढील आर्थिक वर्षात देशांतर्गत मागणी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठी भूमिका बजावणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Related Stories

टाटा समूहाकडे 8लाख कर्मचारी

Patil_p

अदानी समूहाच्या समभागात घसरण सुरुच

Patil_p

जिओमध्ये महिन्यात केकेआरची पाचवी मोठी गुंतवणूक

Patil_p

एचडीएफसी लिमिटेडच्या कर्ज वितरणात वाढ

Patil_p

एअर इंडिया आपल्या ताफ्यात 30 विमानांची भर घालणार

Patil_p

पोलादाच्या किंमती वाढल्या

Patil_p