Tarun Bharat

अंडीफेक घटनेची चौकशी करणार

मुख्यमंत्री बोम्माई ः कोडगू दौऱयावेळी सिद्धरामय्या यांच्या कारवर फेकण्यात आली होती अंडी

प्रतिनिधी/ बेंगळूर

विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गुरुवारी कोडगू जिल्हय़ातील नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. त्याकरिता ते मडिकेरी येथे आले असता भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची कार अडविली. यावेळी कारवर अंडी फेकण्यात आली. या घटनेचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी खंडन केले आहे. या घटनेची आपण गांभीर्याने दखल घेतली असून संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सिद्धरामय्या यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना बोम्माई यांनी, कोडगू येथील घटनेविषयी आपण सिद्धरामय्यांशी चर्चा केली आहे. कारवर अंडी फेकण्यात आलेल्या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. समाजमन भडकविण्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेला धक्का पोहोचविण्याची कृत्ये कोणीही करू नयेत. अशी कृत्ये होणार नाहीत याकडे लक्ष देण्याचे आदेश सर्व जिल्हा पोलीसप्रमुखांना देण्याची सूचना पोलीस महासंचालकांना करण्यात आली आहे, अशी माहिती बोम्माई यांनी दिली.

पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई कोडगू जिल्हा दौऱयावर गेले होते. सिद्धरामय्या यांच्या या दौऱयाला भाजप कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. त्याच वेळी काँग्रेसचे कार्यकर्तेही तेथे दाखल झाल्याने दोन्ही गटात वादावादी झाली होती. दरम्यान, सिद्धरामय्या यांच्या कारवार अंडी फेकण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पक्षभेद विसरून सर्व नेत्यांनी या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला आहे.

Related Stories

49 वर्षांनी सैनिकाचा सुगावा, पत्नीच्या प्रयत्नांना अखेर यश

Patil_p

देशात 81,484 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

लसीकरणासंबंधी आज ‘पीएम-सीएम’ संवाद

Patil_p

chittahproject;पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडले

Archana Banage

सर्वात उंच युद्धभूमीवर महिला अधिकारी तैनात

Patil_p

आंध्रमध्ये विधान परिषदेचे अस्तित्व संपुष्टात येणार

Patil_p