मेक्सिकोच्या एका समुदायाची अजब प्रथा
जगात लोकांच्या आहारमध्ये सर्वाधिक वैविध्य दिसून येते. एका देशात लोक ज्या गोष्टीला आहारात समावेश करणे पसंत करत नाहीत, तीच गोष्ट अन्य देशातील लोक अत्यंत आवडीने खात असतात. अनेक देशांमध्ये लोकांचा आहार अत्यंत विचित्र असतो.
एका देशात एका डिशला देवतांचे भोजन मानले जाते. मेक्सिको सिटीत लोक किडय़ांच्या अंडय़ांना देवतांचे भोजन मानतात आणि याचे सेवन करतात. मेक्सिको सिटीपासून काही अंतरावर एक तलाव असून त्याचे नाव टेक्सकोको आहे. या तलावात वेगवेगळय़ा प्रकारचे जीव राहतात आणि यात पाण्यात आढळून येणारा किडय़ाचाही अधिवास आहे. हा एक प्रकारचा डास असल्याचे लोक मानतात, येथे या किडय़ाची अंडी लोक खात असतात.
या किडय़ाच्या अंडीला आहुआट्ले म्हटले जाते. ही अंडी आकाराने अत्यंत छोटी असतात आणि तेथे त्यांना देवतांचे भोजन म्हटले जाते. आहुआट्लेचा अर्थ आनंदाचे बीज असा होतो. मेक्सिकोत एजटेक साम्राज्याच्या काळापासून (14-15 व्या शतकापासून) लोक याचे सेवन करत आले आहेत.
मच्छिमार या जीवाच्या अंडय़ांचे रक्षण करतात. अंडी एकत्र करण्यासाठी शेतकरी पाण्याच्या पृष्ठभागाखाली एक मोठे जाळे बांधनात आणि त्यावर किडय़ांनी अंडी दिल्यावर ती एकत्र केली जातात. यापासून डिश तयार करण्यासाठी मैदा आणि तेलाचा वापर करण्यात येतो. परंतु मेक्सिकोच्या सिटीच्या अनेक रेस्टॉरंटमध्ये ही डिश तयार केली जात नाही. सध्याची तरुणाई ही डिश खाणे पसंत करत नाहीत. अनेक लोकांना तर आता या डिशबद्दल माहिती देखील नाही. आहुआट्लेच्या अंडय़ाची किंमत खूपच अधिक असते. 1600 रुपयांमध्ये अंडय़ाचा एक छोटा जार 2019 मध्ये मिळत होता.