Tarun Bharat

आठ दिवसांचा तेजीचा प्रवास अखेर थांबला

सप्ताहाच्या अंतिम सत्रात सेन्सेन्स 416 अंकांनी नुकसानीत

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारातील सलग आठ दिवसांच्या सेन्सेक्स व निफ्टी यांच्या तेजीच्या प्रवासाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. चालू सप्ताहात विविध विक्रम नोंदवत बाजाराची घोडदौड कायम राहिली होती. परंतु शुक्रवारच्या सत्रात मात्र या कामगिरीला पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले. विविध घडामोडींमध्ये बीएसई सेन्सेक्स 416 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला. तर जागतिक बाजारातील नकारात्मक स्थिती व नफा कमाईच्या प्रभावात बाजाराला नुकसान सहन करावे लागले आहे. प्रमुख कंपन्यांमध्ये दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 415.69 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 62,868.50 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेरीला 116.40 अंकांनी घसरुन निर्देशांक 18,696.10 वर बंद झाला आहे. सत्रात काहीवेळ सेन्सेक्स तब्बल 604.56 अंकांनी नुकसानीत राहिला होता.

प्रमुख कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती, नेस्ले इंडिया, एचडीएफसी, एशियन पेंटस, बजाज फायनान्स आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचे समभाग नुकसानीत राहिले होते. तर अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, डॉ.रेड्डीज, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक आणि एचसीएल टेक यांचे समभाग लाभासह बंद झालेत.  आशियातील अन्य बाजारात दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग नुकसानीत राहिला आहे. युरोपमधील मुख्य बाजार सुरुवातीला घसरणीत राहिला होता. जागतिक बाजारांमधील नकारात्मक कल आणि मोठय़ा कंपन्यांच्या समभागातील नफा कमाईच्या कारणास्तव बाजारातील तेजी थांबली आहे. बाजारांमधील वाहन क्षेत्रातील समभागात घसरण राहिली आहे. यासोबतच निर्यात कमी राहिल्याने वाहन विक्रीचा आकडा अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचाही परिणाम बाजारावर झाला असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.13 टक्क्यांच्या घसरणीसोबत 86.77 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.

Related Stories

सॅमसंगचा विंड फ्री एसी बाजारात

Patil_p

मारुती सुझुकीच्या नफ्यामध्ये दमदार वाढ

Patil_p

रुची सोया झाली कर्जमुक्त

Patil_p

होंडाने विदेशातील उत्पादन थांबवले

Patil_p

टाटाचा 3 राज्यांमध्ये सेमिकंडक्टरचा प्रकल्प

Patil_p

बर्गर किंगचा लवकरच आयपीओ

Patil_p