Tarun Bharat

निवडून आलेले सरपंच 30 डिसेंबरला पदभार स्वीकारणार

The elected Sarpanch will assume office on December 30

सावंतवाडी तालुक्यातील 52 ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच व सदस्य निवडून आले आहेत. आता थेट सरपंचांची पहिली सभा व उपसरपंच निवड एकाच वेळी 30 डिसेंबरला सकाळी 11 वाजता होणार आहे. 52 ग्रामपंचायतींचा पाच वर्षाचा सरपंचांचा कार्यकाल 30 डिसेंबरला संपत आहे. त्याच दिवशी थेट सरपंच निवडून आलेले. हे आपला पदभार स्वीकारणार आहेत .आणि त्याच दिवशी पहिली सभा होणार आहे. आणि या सभेतच उपसरपंच निवड होणार आहे. सावंतवाडी तालुक्यात 52 ग्रामपंचायतींपैकी जवळपास निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतीवर भाजप बाळासाहेबांचे शिवसेना युतीचे सरपंच निवडून आले आहेत .तर नऊ ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे सरपंच व सदस्य निवडून आले आहेत.

तर बहुतांशी ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सदस्य तर काही महाविकास आघाडीचे सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे उपसरपंच पदासाठी काही ग्रामपंचायतीमध्ये पक्ष बलाबल कुणाचे हे पाहायला मिळणार आहे. उपसरपंच कुठल्या पक्षाचे बसतात याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपल्या निवडून आलेल्या सदस्यांना सावध करण्यास सुरुवात केली आहे. आणि त्या दृष्टीने उपसरपंच आपल्या पक्षाचा बसवण्याच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची निवडणूक 30 डिसेंबरला होणार असल्याचे निवडणूक निर्णय सहाय्यक अधिकारी लता वाडकर व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी / प्रतिनिधी

Related Stories

“सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होण्याच्या मार्गावर – सरन्यायाधीश

Abhijeet Khandekar

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ‘या’ चेहऱ्यांना संधी

Archana Banage

कारागृह नव्हे, सुधारगृह…!

NIKHIL_N

सागरेश्वर अभयारण्याची ऊच्चस्तरीय समितीकडुन चौकशी – आ.अरुण लाड

Abhijeet Khandekar

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

Archana Banage

बंदर विभागाकडून गणपतीपुळे समुद्रकिनारी पाहणी

Patil_p