Tarun Bharat

चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार

5 फेब्रुवारी 2023 ला मतदान होणार

प्रतिनिधी/कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अंतर्गत वादामुळे महामंडळाची निवडणूक धर्मदाय उपायुक्त कार्यालय घेणार आहे. त्यानुसार धर्मदाय कार्यालयाकडून चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार केला आहे. या निवडणूक कार्यक्रमाला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर तो जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.

चित्रपट महामंडळ मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धर्मदाय उपायुक्त कार्यालयाचे निरिक्षक आसिफ शेख काम पाहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट महामंडळाचा निवडणूक कार्यक्रम तयार केला आहे. त्यानुसार मतदान 5 फेब्रुवारी 2023 ला व 8 फेब्रुवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जानेवारी 2023 ला सुरू होईल. 9 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होईल. 10 ते 16 जानेवारी उमेदवारी अर्ज भरावयाचा आहे. तर 18 ते 20 जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज माघार घेतले जातील. प्रत्यक्ष मतदान 5 फेब्रुवारी 2023 ला होणार असल्याने इच्छुकांना तब्बल तीन महिने प्रचारासाठी मिळणार आहेत.

Related Stories

सागरी सुरक्षेच्या त्रिपक्षीय चर्चेसाठी अजित डोवाल श्रीलंकेत

datta jadhav

पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांची मंत्रीमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी

datta jadhav

उद्यापासून ‘या’ 11 मार्गांवरील PMPML ची सेवा बंद

datta jadhav

सीबीएसमधील रस्त्यांना आठ वर्षे डांबरच नाही

Archana Banage

मान्सून २ दिवसांत राज्यात धडकणार

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात ८ बळी, दिवसभरात १६७ पॉझिटिव्ह

Archana Banage