प्रतिनिधी/ बेळगाव
श्री ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ, शहापूर यांच्यातर्फे 15 ते 21 ऑगस्टदरम्यान जयशंकर भवन येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा लक्ष्मण बन्नार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. रामकृष्ण कुदळे यांच्या हस्ते पताका चढवून पारायणाची सुरुवात करण्यात आली. ह.भ.प. भसू महाराज हिरेमठ यांच्या अधि÷ानाखाली ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन करण्यात आले.
रोज दुपारी 3 ते 4 राम नाम जप झाला. तसेच 4 ते 5.30 पर्यंत विविध महिला भजनी मंडळे आणि अन्य मंडळांचे भजन झाले. 5.30 ते 6 दरम्यान व्यंकटेश वाळवेकर, बसू महाराज हिरेमठ, शंकर महाराज राठोड, ज्ञानेश्वर काकडे, संतोष पुष्टे, लव नार्वेकर यांची प्रवचने झाली. 7.30 ते 9.30 विविध मंडळांचे भजन झाले. हभप यल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा गिरमल, मोहन वादवने, मारुती पाटील व शंकरराव बांदकर यांची किर्तने झाली.
रविवार दि. 21 रोजी बसू महाराज यांचे ग्रंथवाचन झाल्यानंतर माधुरी व सागर जगताप यांनी पाद्यपूजन केले. अजित पाटील, सुरेश सदरे, शंकर गेंजी, बंडू माळवी यांनीही पाद्यपूजन केले. त्यानंतर लव महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. दिंडी प्रदक्षिणा झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.