Tarun Bharat

एका झटक्यात शत्रू होणार खतम

अतिवेगवान वाहनाची इस्रो आणि एकीकृत संरक्षण प्राधिकरणाकडून संयुक्त निर्मिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि एकीकृत संरक्षण प्राधिकरणाच्या संयुक्त प्रयत्नाने भारताचे अतिवेगवान (सुपरसॉनिक) वाहन विकसीत करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. या वाहनामुळे भारताच्या संरक्षण दलांची मारक क्षमता प्रचंड प्रमाणात वाढणार असून शत्रूला एका झटक्यात संपविण्याची क्षमता त्यात आहे. विशेषतः पाकिस्तान आणि चीनच्या आक्रमकपणाला वठणीवर आणण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या वाहनाने परीक्षणाच्या कालावधीत सर्व महत्वाचे निकष समाधानकारकरित्या पूर्ण केले आहेत. या यानाची क्षमता उच्च आहे. हे यान त्याच्यावरील क्षेपणास्त्र किंवा शस्त्रासह ध्वनीच्या पाचपट अधिक वेगात शत्रूवर प्रहार करते. त्यामुळे शत्रूला सावरण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे शत्रूचा नाश केला जातो.

हे वाहन अंतराळात अतिशय वेगाने पोहचते. लांब अंतरावरुन ते शत्रूवर अचूक मारा करते. या यानाचा उपयोग संरक्षण, आक्रमण आणि व्यापारी उद्देशांसाठीही उपयोगात आणता येते. हे यान युद्धनौकेच्या स्वरुपात, क्षेपणास्त्रच्या स्वरुपात किंवा अन्य कोणत्याही यानाच्या स्वरुपात कार्य करु शकते. सध्या जगात केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे अशी वेगवान वाहने आहेत.

Related Stories

पाकिस्तान अन् तुर्कस्तानला चांगलेच सुनावले

Amit Kulkarni

हिंदूंविरोधात आग भडकविणारा निघाला मुस्लीम

Amit Kulkarni

निवडणूक आयोग उत्तर प्रदेशचा आढावा घेणार

Patil_p

‘या’ कारणासाठी आम्ही राहुल गांधींचं ते ट्वीट केलं डिलिट; Twitter चे हायकोर्टात स्पष्टीकरण

Archana Banage

उत्तर प्रदेशात कोरोनाचा पहिला बळी

prashant_c

सोपोरमध्ये चकमक; मोबाईल इंटरनेटसह रेल्वे सेवा स्थगित

datta jadhav