Tarun Bharat

सकल हिंदू समाज उतरला रस्त्यावर

साताऱयात सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा ; जिहादी आफताबला फासावर लटकवा

प्रतिनिधी/ सातारा

जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी, श्रद्धा वालकर हिला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत संपूर्ण सातारा शहर सकल हिंदू समाजाने काढलेल्या मोर्चाने दणाणून सोडले. लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या या विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी सातारा शहरात काढण्यात आलेल्या विराट मोर्चाने सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारली. तब्बल सात हजाराहून अधिक हिंदू समाजातील कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. प्रमुख नेते मंडळींनीही सहभाग नोंदवला होता.

सकल हिंदू जनआक्रोश मोर्चाची सुरुवात राजवाडा येथील गांधी मैदान येथून करण्यात आली. पुढे मोर्चा मोती चौक, पाचशे एक पाटील, पोलीस मुख्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चाला नियोजन केल्याप्रमाणे शिस्त होती. मोर्चात अग्रभागी महिला होत्या. महिलांनी पारंपारिक पोषाख परिधान केले होते. पुरूषांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. मोर्चात आमदार शिवेंद्रराजे, आमदार महेश शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विक्रम पावस्कर, दत्ताजी थोरात, भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी, माजी नगरसेवक विजय काटवटे, माजी नगरसेवक धनंजय जांभळे, प्रवीण शहाणे, जितेंद्र वाडकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, एकनाथ ओंबळे, ठाकरे गटाचे सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, उपशहर प्रमुख गणेश अहिवळे, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे, सुमीत नाईक यांच्यासह हिदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्चामध्ये बोलताना मेघा माने म्हणाल्या, अठरा वर्ष आपल्या मुलीला काळजाच्या तुकडय़ाप्रमाणे रक्ताचे पाणी करुन आई-वडिल जपतात आणि त्याच तुकडय़ाला भुलवून जिहादी युवक फसवून नेतात. त्या आई-वडिलांना काय वाटत असेल. अशा मुलींना तर आई-वडिलांच्या संपत्तीतला वाटाही दिला नाही पाहिजे. काही मुलींना ब्लॅकमेलिंग केले जाते. पुन्हा परत बाहेर पडावे वाटते. परंतु ती मंडळी पडू देत नाहीत. आज आपल्याच देशात मोर्चा काढावा लागतो. हिंदू मुलींचा बळी जातोय. आता नुसते मोर्चे काढून चालणार नाही. तर हिंदू मुलींवरील अत्याचार थांबतील कसे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना घेऊन स्वराज्य उभे केले. त्या काळी आयाबहिणींकडे कोणी बघितलं तरी त्याला शिक्षा व्हायची. आता मात्र जिहादी तरुण धर्मांतरण केले नाही म्हणून 35 तुकडे करत आहेत, रिक्षातून ढकलून देत आहेत. किती बाटवल्या, किती पेटवल्या, किती विकल्या जात आहेत, शाळा कॉलेजच्या बाहेर फिरणाऱया टोळक्यांनी गुलाबाचे फुल दिले की आमच्या मुली भाळतात. त्यांना कळत नाही. एकदा अडकल्यावर बाहेर पडता येत नाही.

लव्ह जिहाद आताचा नाही 1300 वर्षापासूनचा आहे. पैसे येतात कुठून अरब कंट्रीतून, आयएसआयसारख्या संघटना हिंदूच्या मुलींचे आयुष्य उद्धस्त करण्यासाठी पैसे देतात. लव्ह जिहादचा मुख्य उद्देश हाच की हिंदूची संख्या घटवणे आहे. लव्ह जिहादला कारणीभूत बॉलिवूडही आहे. अभिनेते कोण तर अमिर खान, शाहरुख खान आणि अभिनेत्री हिंदू. आपल्याही मुलींना तेच सिनेमा दिसतात. कधी आडवले का आपल्या मुलींना हे थांबवायचे असेल तर आपल्या मुलींनी आता झाशीची राणी झाले पाहिजे, ताराराणी झाले पाहिजे, असे आवाहन करत पुढे त्या म्हणाल्या, आपल्या देशात ब्रिटीश काळात गायीची कातडे बंदूकीच्या काडतुसाला लावल्याच्या कारणावरुन मंगल पांडे यांनी उठाव केला होता. हा इतिहास आहे. आणि आज याच हजारो गायींची कत्तली होत आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे, असे परखड मत त्यांनी मांडले.

जिल्हाधिकाऱयांना शिष्टमंडळाने दिले निवेदन

शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन दिले. त्या निवेदनामध्ये लव्ह जिहादवर त्वरीत बंधने आणून हिरवा दहशतवाद संपविण्यासाठी व लव्ह जिहाद रोखण्यासाठी त्वरीत कडक कायदा करण्यात यावा व त्याची अंमलबजावणी व्हावी, गोवंश हत्या बंदी कायदा अधिक बळकट करावा व त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी व तसे निर्देश प्रशासनास दयावे यासह तब्बल 11 मागण्या करण्यात आल्या आहेत.

Related Stories

पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी

Archana Banage

मान्सून दोन दिवसात भारताबाहेर

datta jadhav

प्रधानमंत्री यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण

Rohit Salunke

सातारा : ग्रामसेवकास धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Archana Banage

राज्यात सध्या लॉकडाउन नाही : मुख्यमंत्री

Archana Banage

Satara; मंत्री शंभूराज देसाई यांचे साताऱ्यात जंगी स्वागत; कार्यकर्त्यांचा भर पावसात जल्लोष

Abhijeet Khandekar