Tarun Bharat

अधिक महागाईचा काळ समाप्त ः शक्तिकांत दास

डॉलरच्या मजबुतीमुळे  समस्या नाही ः आरबीआय गव्हर्नरांचा दावा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

महागाईवरून विरोधी पक्ष सरकारची कोंडी करू पाहत असताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईचा प्रतिकूल काळ मागे पडल्याचे म्हटले आहे. भारताचे वित्तीय क्षेत्र स्थिर असून तीव्र महागाईचा काळ समाप्त झाला असल्याचे विधान दास यांनी केले आहे.

भारताचे बर्हिगत कर्ज व्यवस्थापन योग्य असून डॉलर मजबूत झाल्याने कुठलीच समस्या उद्भवणार नाही. डॉलरचे मूल्य वाढल्याने उच्च कर्जाची जोखीम असलेल्या देशांना मदत करण्यासाठी जी-20 कडून प्रयत्न केले जावेत. जी-20 देशांनी हवामान बदलाने सर्वाधिक प्रभावित देशांना युद्धपातळीवर आर्थिक मदत उपलब्ध करावी असे आरबीआय गव्हर्नरांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या बँकिंग क्षेत्रातील सध्या निर्माण झालेले संकट पाहता खासगी क्रिप्टोकरन्सी वित्तीय प्रणालीसाठी कशाप्रकारचे जोखीम निर्माण करते हे स्पष्ट होते. अत्याधिक ठेवी अणि कर्जवृद्धी बँकिंग प्रणालीसाठी योग्य स्थिती नव्हे असे उद्गार आरबीआय गव्हर्नर दास यांनी म्हटले आहे.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना 2023 साठी ‘गव्हर्नर ऑफ द ईयर’ने गौरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक शोध नियतकालिक सेंट्रल बँकिंगने दास यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे 2015 मध्ये हा पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय गव्हर्नर ठरले होते.

सेंट्रल बँकिंगने आव्हानात्मक काळात स्थिर नेतृत्व देण्यासाठी दास यांचे कौतुक केले आहे. एका बिगर बँकिंग फर्मचे पतन, कोरोना महामारीची पहिली आणि दुसरी लाट, युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणामुळे वाढत्या महागाईच्या काळात गव्हर्नर दास यांनी दाखविलेले मजबूत आणि कुशल नेतृत्व प्रशंसनीय असल्याचे सेंट्रल बँकिंगकडून म्हटले गेले आहे.

Related Stories

मंदिरांमध्ये हनुमान चालिसा, मंत्रपठण

Patil_p

ममता बॅनर्जींचे केंद्र विरोधात धरणे आंदोलन

Patil_p

देशात 60,753 नवे बाधित

datta jadhav

एमएसपीसाठी सरकारकडून समिती स्थापन

Patil_p

भारत-पाक सीमेवर घुसखोराला कंठस्नान

Patil_p

भिंडमध्ये वायुदलाचे लढाऊ विमान कोसळले

Amit Kulkarni