इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानात इम्रान खान यांची पंतप्रधानपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वात संयुक्त सरकार स्थापन करण्यात आले आहे. या सरकारमध्ये बिलावल भुत्तो-झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाचा तसेच आणखी काही छोटय़ा पक्षांचा समावेश आहे. शरीफ यांचा पंतप्रधानपदी शपथविधी होईल काही दिवस लोटले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तो लवकर होणार नाही, असे राजकीय तज्ञांचे मत आहे. शरीफ यांच्यासमोर विविध पक्षांमध्ये सत्तासमतोल सांभाळण्याचे आव्हान आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागण्याची शक्यता आहे.
संयुक्त सरकारमधील दोन्ही मुख्य पक्षांच्या नेत्यांनी पाकिस्तानातील काही वासंस्थांना मुलाखती दिल्या आहेत. या मुलाखतींमध्ये त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागण्याचे संकेत दिले. संयुक्त सरकारमध्ये अनेक छोटे पण बहुमतासाठी महत्वाचे पक्ष आहेत. त्यांना सरकारमध्ये स्थान द्यावे लागणार आहे. तसेच त्यांच्या संसद सदस्यांना खाती द्यावी लागणार आहेत. त्यांच्या शक्यतोवर त्यांच्या आवडीची खाती दिली जातील, असे मुख्य पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
निसटते बहुमत
शरीफ यांच्या सरकारला राष्ट्रीय संसदेत अवघ्या तीन मतांचे निसटते बहुमत आहे. त्यामुळे सरकार बहुमतात असले तरी म्हणावे तसे स्थिर नाही. एका छोटय़ा पक्षाने पाठिंबा काढला तरी सरकारची स्थिती दोलायमान होऊ शकते. त्यामुळे सर्व समर्थक पक्षांचे समाधान करण्याची मोठी जबाबदारी शरीफ यांना पार पाडावी लागणार असल्याने मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण विचाराअंतीच होणार आहे.
पीपीपी मंत्रिमंडळाबाहेर राहणार ?
संयुक्त सरकारमधला दुसरा सर्वात मोठा पक्ष पीपीपी हा कदाचित मंत्रिमंडळात समाविष्ट होणार नाही, असे बोलले जात आहे. या पक्षामध्ये मोठय़ा प्रमाणात अतंर्गत मतभेत आहेत. तसेच अनेक गटतटही आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात समावेश झाल्यास हे मतभेद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरीफ सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय बिलावल भुत्तो घेण्याची शक्यता आहे.