मजगाव : मजगावातील शेतवडीतील रस्ते पूर्ण निकामी, चिखलमय झाले आहेत. पायी चालणेही अवघड झाले होते. शेतमजुरांना पावसाळ्यात शेताकडे ये-जा करण्यासाठी खबरदारी म्हणून मजगावच्या सर्व शेतकऱ्यांनी स्वखर्चाने जेसीबी व ट्रॅक्टर्स लावून येथील श्री ब्रह्मदेव मंदिरासमोरील तलावातील लाल माती रस्त्यावर टाकून ये-जा करण्यासाठी सोयीस्कर करत आहेत. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणीही न फिरकल्याने सर्व तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेवून रस्त्यावर लाल माती टाकल्याने ये-जा करण्यास सोयीस्कर झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून सदर रस्ता प्रशासनामार्फत खडीकरण करून द्यावा आणि शेतकऱ्यांचा दुवा घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Previous Articleआषाढीसाठी हुबळी-पंढरपूर रेल्वे सुरू करा
Next Article शेतवडीत पाणी साचल्याने भात उगवणीवर परिणाम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.