Tarun Bharat

बिबटय़ाची भीती कायम

Advertisements

अद्याप शोध नाहीच : बुधवारी नागरिकांना निदर्शनास आल्याची चर्चा

प्रतिनिधी /बेळगाव

जिल्हय़ात विविध ठिकाणी बिबटय़ाचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास येत आहे. बेळगाव तालुक्मयातील बेळवट्टी परिसरातही शेतकऱयांना बिबटय़ा असल्याचे आढळून आले आहे. तसेच रेसकोर्स मैदान परिसरातील बिबटय़ाचे पुन्हा एकदा नागरिकांना दर्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या बिबटय़ांना जेरबंद करण्यात वनखात्याला अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

जाधवनगर येथे गवंडी कामगारावर हल्ला करून रेसकोर्स मैदानाच्या झाडांमध्ये आसरा घेतलेल्या बिबटय़ाला पकडण्यासाठी वनखात्याने बरेच परिश्रम घेतले. पण 13 दिवसांनंतरही बिबटय़ाचा ठावठिकाणा वनखात्याला सापडला नाही. वनखात्याने रेसकोर्स मैदान परिसरात 14 टॅप कॅमेरे, 6 पिंजरे रचले आहेत. तसेच बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी 70 कर्मचाऱयांसह ड्रोन कॅमेऱयाद्वारे प्रयत्न करण्यात आले. पण वनखात्याच्या हाती काहीच लागले नाही. सध्या पाऊस असल्याने पाऊलखुणा देखील सापडणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे बिबटय़ा नेमका कोणत्या परिसरात आहे? याची माहिती मिळणे कठीण बनले आहे.

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरून जाणाऱया काही वाहनधारकांना मंगळवारी रात्री अरगन तलाव परिसरात बिबटय़ाचे दर्शन झाल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी ही माहिती वाहनधारकांनी गणपती मंदिराशेजारी गस्तीवरील पोलीस अधिकाऱयांना दिली. त्यामुळे गणपती मंदिराजवळ बॅरिकेड्स लावून रात्री अरगन तलाव परिसरातील रस्त्यावरून जाणाऱया वाहनधारकांना दुसऱया मार्गाने जाण्याची सूचना केली. त्यामुळे वाहनधारकांना अन्य मार्गांचा अवलंब करावा लागला. बिबटय़ाचा माग लागत नसल्याने हनुमाननगर, जाधवनगरसह परिसरातून ये-जा करणारे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे बिबटय़ा कधी जेरबंद होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

बिबटय़ा रेसकोर्स मैदानातच की अन्य ठिकाणी…

बिबटय़ा दिसला असल्याचे काही नागरिक सांगत आहेत. पण प्रत्यक्षात बिबटय़ाचे छायाचित्र किंवा कोणत्याही हालचाली कॅमेऱयामध्ये दिसून आल्या नाहीत. त्यामुळे बिबटय़ा रेसकोर्स मैदानातच आहे की तेथून अन्य ठिकाणी गेला? याची माहिती मिळत नसल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. चार दिवसांनंतर काही नागरिकांना बुधवारी सकाळी बिबटय़ाचे दर्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे. अरगन तलाव परिसरासह रेसकोर्स मैदानाच्या परिसरातच बिबटय़ा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

न्यायालयाच्या निकालामुळे सौहार्द सहकारी करमुक्त

Patil_p

वर्दळ वाढली… खरेदी मंदावली

Patil_p

धडाडीचे शिक्षक-पत्रकार म्हणून एन.ओ.चौगुलेंचा ठसा

Amit Kulkarni

अरेबियन देशांनी फ्रान्सबरोबरचे संबंध तोडावेत

Patil_p

तेरा वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण

Patil_p

राष्ट्रीय टेटे स्पर्धेत बेळगावची तनिष्का काळभैरव उपविजेती

Amit Kulkarni
error: Content is protected !!